Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक विभागात पॉलिटेक्निकच्या 28 हजार जागा

Share

नाशिक । प्रतिनिधी
नाशिक विभागात पॉलिटेक्निकच्या (तंत्रशिक्षण) एकूण 84 महाविद्यालयांमध्ये सुमारे 28 हजार जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. नाशिकमधील 25 महाविद्यालयांत तंत्रशिक्षणाच्या 10 हजार 200 जागा उपलब्ध आहेत. त्याखालोखाल नगर जिल्ह्यात 25 महाविद्यालयांत 8 हजार 605 तसेच जळगाव येथे 5 हजार 785, धुळे येथे 2 हजार 809 व नंदुरबारला 900 जागा उपलब्ध आहेत.

अभियांत्रिकी शाखेच्या पदविकेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून इच्छुक विद्यार्थ्यांना 18 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांत पूर्ण होईल. डिप्लोमा प्रवेशाच्या प्रक्रियेत यंदा अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. मागील वर्षी अनिवार्य असलेली गणित (71 कोड) आणि विज्ञान (72 कोड) ही अट यंदाच्या वर्षापासून काढून टाकण्यात आली आहे.

त्यामुळे दहावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरणार आहेत. दहावीच्या परीक्षेत तसेच समकक्ष शिक्षणक्रमात 35 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारा विद्यार्थी डिप्लोमा प्रवेशासाठी पात्र ठरेल. सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 400 तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 300 रुपये शुल्क मोजावे लागणार आहे.

तंत्रशिक्षण महाविद्यालयांची संख्यादेखील वाढली असून दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अकरावी आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक
ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची अंतिम मुदत – 18 जून
प्रारूप गुणवत्ता यादी जाहीर होणार – 19 जून
हरकती नोंदवण्याची मुदत – 20 व 21 जून
अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार – 24 जून
आरक्षणनिहाय जागांचा तपशील जाहीर होणार – 24 जून
कॅप राऊंड-1 साठी पर्याय निवडीची मुदत- 25 ते 28 जून
पहिली निवड यादी जाहीर होणार – 1 जुलै
एआरसी सेंटरवर प्रवेश घेण्याची मुदत – 2 ते 6 जुलै
दुसर्‍या कॅप राऊंडसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार – 8 जुलै
दुसर्‍या कॅप राऊंंडसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया होणार – 9 ते 12 जुलै
दुसर्‍या कॅप राऊंडसाठी निवड यादी जाहीर होणार – 15 जुलै.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!