Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नांदुरी : शरद पवार यांच्या भेटीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा

Share

नांदुरी । किरण आहिरे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार जिल्हा दौऱ्यावर असून दुपारच्या सुमारास नांदुरी या ठिकाणी त्यांनी भेट दिली. त्यावेळी नांदुरीजवळ असलेल्या गोबापुर येथील शेतकरी गंगाधर खांडवी यांच्या शेतातील सोयाबीन व बाजरी पिकाची पहाणी केली. तसेच शेतीचे नुकसान समजावून घेत याबाबत शासन बेजबाबदार असुन शेतकऱ्यांना मदतीसाठी सहकार्य करण्याचे सांगितले. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी शेतपिकांच्या नुकसानी बाबत तक्रार करत समस्यांचा पाऊस पाडला.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे द्राक्ष, कांदा, भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सुमारे साडे तीन लाख हेक्टरवरिल पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे.

यासंदर्भात शरद पवार जिल्हा दौऱ्यावर होते. दुपारी पिंपळगावला भेट दिल्यानंतर ते कळवण तालुक्यातील नांदुरी जवळील गोबापूर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

‘बेजबादार सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे एनडीसीसी बँक डबघाईस आली असुन आम्हा शेतकऱ्यांचा आत्मा असलेली बँक बुडाल्याने शेतकरी उध्वस्त झालो,’ अशा शब्दांत शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडले. यावेळी कळवणचे आमदार नितीन पवार, दिंडोरीचे नरहरी झिरवाळ, निफाडचे दिलिप बनकर, सिन्नरचे माणिकराव कोकाटे यांच्या सह परीसरातील शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित राहुन आदिवासी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!