Type to search

नांदगाव : पाणी भरतांना वीजपंपाचा शॉक लागून युवकाचा मृत्यू

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नांदगाव : पाणी भरतांना वीजपंपाचा शॉक लागून युवकाचा मृत्यू

Share

नांदगाव। प्रतिनिधी 

नांदगाव तालुक्यातील पळाशी येथील युवकाचा पाणी भरतांना वीजपंपाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. योगेश आनंदा सांगळे (२७) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना आज दुपारी घडली. परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नांदगाव तालुक्यातील पळाशी येथे पाण्याचा टँकर आला असता पाण्याचा टाक्या भरून त्यावर पाण्याची मोटार ठेवून वीज बोर्डवर पिन लावत असतांना विजेचा शॉक लागून पडला आणि नातेवाईकांनी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन बोरसे यांनी मयत घोषित करण्यात आले. नांदगाव पोलिसांत अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली असून ए.एस.आय पगारे करीत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!