Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नांदगाव : मांडवड येथे एकाच रात्री दोन घरफोड्या

Share

नांदगाव। प्रतिनिधी
नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे एकाच रात्री दोन घर फोड्या झाल्या असून दोन्ही मिळून एक लाख ऐवज चोरीस गेला असल्याचे समजते.

तालुक्यातील मांडवड येथे मध्यरात्री १ ते ३ वाजेच्या सुमारास सरुबाई बोरसे यांच्या घरातील दिड तोळे सोने व पंधरा हजार रुपये रोख व संदीप पिंगळे याचे सोने चांदी व रक्कम असा दोनही घर मिळून एक लाखा पर्यंत ऐवज चोरी गेला आहे.

तालुक्यात उष्णता वाढल्याने दोन्ही कुटुंबातील सर्व सदस्य घरासमोरील ओट्या वर झोपलेले असताना सदरील प्रकार घडला आहे.सरुबाई बोरसे यांचे झोपेत असतांंना गळ्यातील पोत ओढली गेल्याने जाग आली असता प्रतिकार करताना एका चोराचे हात मोजे व बनियानचा तुकडा झटापट झाल्याने हाती आला आहे.

रात्रीच पोलीस ठाण्यात माहिती दिली असता नांदगाव पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी सहकाऱ्यांना बरोबर घेऊन मांडवड येथे धाव घेतली व श्वान पथक मागवले तसेच रात्री परिसर पिंजून काढला परंतु चोरांचा तपास लागू शकला नाही. श्वान पथकाने जवळील डोंगर चढून गेल्याचे माग दाखविला आहे. पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक अनिल भवारी करीत आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!