Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नांदगाव : विहरीत पडलेल्या काळवीटास जीवदान

Share

नांदगाव। प्रतिनिधी
नांदगाव तालुक्यात पाण्याच्या शोधासााठी हरीण भटकंती करीत असताना विहिरीत पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. हरणाच्या पाडसाला व काळवटीला वाचविण्यात वन्यप्रेमीच्या मदतीने वनविभागाला यश आले.

तालुक्यातील दहेगाव येथील राजू बागुल यांच्या शेतातील विहिरीत एक हरणाचे पाडस पाण्याच्या शोधात असताना पडले. राजू बागुल हे विहिरीत पाणी रोंदण्यासाठी गेले असता त्यांना हरणाचे पाडस पाण्यात तरंगताना दिसले. त्यांनी ग्रामसेवक रवींद्र पाटील यांना माहिती दिली. पाटील यांनी वन विभागाचे वन रक्षक बी.जे. सूर्यवंशी यांना दूरध्वनीवरून हरणाचे पाडस विहीरीत पडल्याचे कळविले. सूर्यवंशी यांच्या समवेत त्यानंतर वन्यजीवप्रेमी संदीप जेजुरकर स्थानिक रहिवासी असलेले विलास देवरे हे विहिरीत उतरले.

आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत असलेल्या त्या पाठसाला श्री. जेजुरकर यांनी अलगद धरले व विलास देवरे. राजू बागुल, ग्रामसेवक रवींद्र पाटील, तुकाराम कदम, दत्तू देवरे, दिगंबर देवरे, धनराज कदम यांच्या मदतीने वेळेच्या विहिरीच्या बाहेर काढले. विहिरीच्या बाहेर काढताच हरणाच्या पाडसाने शेतात पुन्हा धूम ठोकली.

तर दुसऱ्या घटनेत मांडवड शिवारातील शेतकरी सुधाकर चंद्रसेन आहेर यांच्या मक्याच्या शेतातील चिखलात फसल्याने काळवीट जातीचे हरीण जखमी झाले. त्या सुधाकर आहेर यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने शेताच्या बाहेर काढून वनरक्षक बी.जे. सूर्यवंशी यांच्या स्वाधीन केले.

काळविटाच्या डाव्या पायाला मुक्का मार लागल्याने त्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वनविभागाच्या कार्यालयात उपचार केले.
दरम्यान,उद्या(गुरुवारी) वनविभागाच्या हद्दीत काळविटाला सोडण्यात येणार असल्याची माहिती वनकपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय बोरसे यांनी सांगितले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!