
नांदगांव। मन्याडनदी, मुळडोंगरी भागात अवैध वाळू उपसा सुरूच आहे. महसूल विभागाकडून जूजबी कारवाईच नाटक होत असल्याने वाळू तस्करांचे आर्थीक संबध वाढल्याचे चित्र आहे. पोलिस विभाग देखील याला सामील असून, महसूल विभागातील एका कर्मचाऱ्याकडून कडून वसूलीचा दणका होत असल्याने लाखो रूपयांची वाळू जिल्ह्याकडे रवाना होत असल्याची चर्चा नागरीकांमध्ये आहे.
मन्याडनदी पात्रातील मुळडोंगरी भागातील मोठे नाले वाळू उपसा केंद्र ठरू पहात आहेत. वाळू माफीयांनी सध्या ओढ्या लगत असणाऱ्या शेतजमीनी खरेदी अथवा वाळू उपसा पोटी विकत घेतल्याचे दिसून येत आहे. शेतात वाळूचे साठे सापडत असल्याने वाळू तस्करांचे लोंंढे या परीसरात दिसू लागले आहेत. काही दिवसापुर्वी या परीसरात वाळू वाहतूकीअवैध वाळू उपसावर कारवाई करण्यात आली होती. पण सध्या या भागातील वाळू ला सोन्याचा भाव आल्याने बडे वाळू वाहतूकदार यांची गर्दी या परीसरात दिसू लागली आहे.