Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नांदगाव – वेहेळगाव रस्त्यावरील जामदरी जवळ वऱ्हाडाचा टेम्पो उलटल्याने एक ठार , ४५ जखमी

Share

नांदगाव। प्रतिनिधी : नांदगाव – वेहेळगाव रस्त्यावरील जामदरी फाट्याजवळ हातगाव(ता.चाळीसगांव) येथील वऱ्हाड नाशिक येथील लग्नावरून परतत असतांना वऱ्हाडाचा टेंपो पलटी झाल्याने सनी भाऊसाहेब आव्हाड ( वय – १० ) हा मुलगा जागीच ठार झाला तर या अपघातात वऱ्हाडातील ४० ते ४५ जण गंभीर जखमी असून नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हातगाव येथील विलास आव्हाड यांच्या मुलीचे लग्न उपनगर येथील इच्छामणी लॉन्स (नाशिक) येथे लग्न होते. लग्न आटोपल्यांतर वऱ्हाडी घराकडे परतत असतांना नांदगाव – वेहेळगाव रस्त्यावरील जामदरी फाट्यानजीक वऱ्हाडाचा टेंपो- ४०७ पलटी झाल्याने झालेल्या अपघातात सनी भाऊसाहेब आव्हाड ( वय – १० ) हा मुलगा ठार जागीच ठार झाला.

तर वऱ्हाडातील ४० ते ४५ जण जखमी झाले..अपघात घडल्यानंतर लगेचच स्थानिक रुग्णवाहिकेद्वारे जखमींना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय अधीक्षक डॉ.रोहन बोरसे यांचेसह शहरातील सर्वच डॉक्टरांनी रुग्णांना प्रथमोपचार केले. शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांची देखील मोठी मदत यावेळी अपघातग्रस्तांना करीत आहेत.

या अपघातात चंद्रकला बाई पोपट आव्हाड, भाऊसाहेब आव्हाड, विजय विठ्ठल आव्हाड, दत्तु बबन आव्हाड, गाया दत्तु आव्हाड, संजय शिवाजी आव्हाड, संगिता निंबा पाटील, राजाराम रंगनाथ आव्हाड, लक्ष्मी राजाराम आव्हाड, शांताबाई गोविंद सांगळे, यमुनाबाई हसरत राठोड, रमेश आव्हाड, काजल भाऊसाहेब आव्हाड, सनी भाऊसाहेब आव्हाड यांच्यासह उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक अनिल भवारी पुढील तपास करीत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!