Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : जळगांव खुर्द येथे बायोडिझेल टँकचा भडका होऊन एकाचा मृत्यू

Share

नांदगाव। प्रतिनिधी
चांदवड-जळगाव महामार्गच्या जळगाव खुर्द येथील एबीडब्लू (रस्त्याचे काम करणारी) प्लॉन्ट येथील साठून ठेवलेल्या बायोडिझेल गाडीमध्ये भरत असतांना मोटरचा स्पार्क होऊन डिझेल टँकचा भडका होऊन एकाचा मृत्यू झाला. या स्फोटाचे वृत्त कळताच पोलीस आणि मनमाड अग्निशमन येथील घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही घटना सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,चांदवड-जळगाव महामार्गच्या जळगाव खुर्द येथील एबीडब्लू(रस्त्याचे काम करणारी) प्लॉन्ट येथील साठून ठेवलेल्या बायोडिझेल गाडीमध्ये भरत असतांना मोटरचा स्पार्क होऊन डिझेल टँकचा भडका होऊन कुंदन गंगाधर सानप (वय-१९)रा. पिपरखेड ता.नांदगाव हा डिझेल भरायचे काम करीत होता. आगीचे लोळ इतके होते की, कुंदनचा होरपळून मृत्यू झाला.

या प्लॉन्ट मध्ये आगीचे लोळ मोठ्या प्रमाणावर येत होते. आजूबाजूला परिसर आगीच्या लोळ पसरले होते.याप्रकरणी नांदगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. घटनास्थळी मनमाड येथील अग्निशमन दल दाखल झाले होते. पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह पोलीस तैनात करण्यात आले होते अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग चौघुले करीत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!