Type to search

नाशिक

नांदगाव : बोलठाण वासियांसाठी दररोज चार टँकरची सोय

Share

बोलठाण : नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील पाणी टंचाई मुक्ती साठी आज पासून टँकर सुरू करण्यात आले आहे. २४ हजार लिटर क्षमता असणाऱ्या ०४ टँकर रोज या प्रमाणे ९६ हजार लिटर पाणी रोज येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी भगवान जाधव यांनी सांगितले.

बोलठाण मागील ३ वर्षा पासून पाणी टंचाई ने झुंजत आहे बोरवेल अधिग्रहण करून ही पाणी वेळेवर मिळत नसल्याने बोलठाण जनतेला पाणी विकत घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आज रोजी २० ते २५ दिवसा आड पाणी मिळते कधी कधी महिना ही ओलांडतो पाणी नाही व त्यात नियोजन ही नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत असल्याचे बोलले जाते आहे.

रोज येणाऱ्या टँकर नुसार ९६ हजार लिटर पाणी ग्रामपंचायत विहिरीत सोडले जाणार असून त्यातुन गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्या भरल्या जाणार असून यामुळे गावाला सुमारे ०८ ते १० दिवसाला पाणी मिळेल अशी योजना असल्याचे जाधव यांनी सांगितले मात्र दरवर्षी होणारी पाणी टंचाई ही मात्र कायम स्वरूपी समाप्त व्हावी.

यासाठी कोणी ही सकारात्मक दिसून येत नाही ही एक शोकांतिका आहे. आज (दि. २६) रोजी प्रथम पाणी टँकरच्या चालकाचा सत्कार सरपंच ज्ञानेश्वर नवले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गणेश शिंदे, भाऊसाहेब यादव, अनिल कायस्थ,सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!