Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : नांदगाव जवळील आईस्क्रीम कंपनीला आग

Share

नांदगाव। प्रतिनिधी 
नांदगाव शहरालगत असलेल्या आईस्क्रीम कंपनीला आग लागल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे समजतेे. या कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावर हि आग लागली आहे. यात जीवितहानी टळली. आगीचे कारण माात्र समजू शकले नाही.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मल्हारवाडी येथील आशा आईस्क्रीम कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आशा कुल्फी कारखाना आग लागल्याने स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

मात्र आगीचे लोळ वाढत राहिल्यामुळे मनमाड व येवला येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये कंपनीचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. आगीचे कारण समजू शकले नाही.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!