कर्जाला कंटाळून नांदगाव तालुक्यातील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

0

नांदगांव (प्रतिनिधी) ता. १२ : तालुक्यातिल गोंडेगाव येथील शेतकरी भगवान गिताराम बोडखे, वय ३२ रा गोंडेगांव या शेतकऱ्याने ८० फुट खोल विहिरीत उडी घेउन आत्महत्या केली.

या शेतकऱ्याचे पितृछत्र १० वर्षांपूर्वी हरपले असून, त्याला एक विधवा आई आहे, पत्नी, दोन मुली व मुलगा आहे. कर्जाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जातेय.

बोलठाण विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज दोन लाख ८० हजार, तर खासगी सावकाराचे व इतर तीन लाख रुपये कर्ज त्याच्यावर होते.

त्याच्या भाचीचे १६ मे रोजी लग्न होते. बँक ऑफ इंडियात असलेल्या बचत खात्यातून खासगी देणेदारी मिटविण्यासाठी आणि लग्नासाठी पैसे मिळत नसल्याच्या विचारातून त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

बँक ऑफ इंडियात त्याचे ४० हजार होते, मात्र नोटबंदीनंतर व रोकड तुटवड्यामुळे ते मिळणे मुश्कील झाले होते.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

*