नांदगाव : अमोदे येथील शेतमजुराची गळफास घेत आत्महत्या
Share

नांदगाव । तालुक्यातील अमोदे येथील शेतमजूर धनराज रामदास पवार (४२) याने नैराश्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील अमोदे येथील शेतमजूर धनराज रामदास पवार(४२) हा रविवार पासून बेपत्ता होता. नातेवाईकाकडे शोधाशोध केली असता मिळून आला नाही. सोमवारी सकाळी बोराळे या रस्त्याच्या कडेला लिंबाच्या झाडाला गळफास घेत असलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला.
याबाबत पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. नांदगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून धनराज पवार यांच्यावर अमोदे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.धनराज पवार पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे.