Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नांदगाव : रोजगार हमी योजनेचे तीन तेरा; चौकशीची मागणी

Share

नांदगाव। प्रतिनिधी
नांदगाव तालुक्यात भयंकर दुष्काळ परिस्थितीमुळे हाताला काम नाही. पिण्यासाठी पाणी नाही. अशी परिस्थिती असताना नांदगाव तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) योजनेचा गाजावाजा करीत हजारो नागरिकांना हाताला काम मिळाले असल्याचे चित्र कागदावर रेखाटले जात असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

नांदगाव तालुक्यातील मुळडोंगरी येथील भगवान गणपत मोरे (रा.मुळडोंगरी ता.नांदगाव) यांनी जिल्हाधिकारी(रो.ह.यो.)यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुळडोंगरी येथील बंधारा दुरुस्तीचे अर्धवट सोडून देण्यात आले आहे.

सदर काम हे जेसीबी मशीन साह्याने करण्यात आले आहे. संबंधित, ग्रामपंचायतीने जॉब धारकांना कार्ड वाटप करण्यात आले नाही.संबंधित जॉब धारकांना फसवणूक केली असून या कामाची सखोल चौकशी करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता.

दरम्यान नांदगाव तालुक्यात शासन दरबारी आकडेवारी नुसार ६३० मजुरांना रोजगार हमी योजनेतून कामे मिळाले आहेत का ? हा प्रश्न उपस्थित होते. रोजगार हमी योजना ही राज्य सरकारची अभिनव योजना म्हणून रोजगार हमी योजनाकडे पाहीले जाते.  या माध्यमातून नांदगाव तालुक्यात ग्रामीण भागात विविध कामे करण्यात येत आहेत. वरील प्रमाणे रोजगार हमी कामे सुरू असतील तर शासन दरबारी मात्र कागदावर योजना आखल्या आहेत, काय ? पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नाशिक येथील उपजिल्हाधिकारी(रो.ह.यो.) या विभागातील अधिकारी (दि.२५) चौकशीसाठी नांदगावी येऊन गेले असुन चौकशीअंती आढळून आल्यास निलंबित करण्यात येईल. असा इशाराही संबंधित अधिकाऱ्यांनी दिला आहे. या प्रकरणी नांदगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!