Type to search

नाशिक

नांदगाव तालुक्यात ९ ठिकाणी पीक विमा केंद्रे सुरु

Share
नांदगाव। प्रतिनिधी 
 शिवसेना पक्षाच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त येथील चांडक प्लाझा येथील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात शेतकरी पीक विमा मदत केंद्राचा शुभारंभ करण्यात आल्यानंतर नांदगाव तालुक्यात नवीन तहसील कार्यालय, साकोरा, वेहेळगाव, बाणगाव, न्यायडोंगरी, बोलठाण, भालूर, मनमाड आदी ठिकाणी पीक विमा केंद्रे सुरु करण्यात आले.
पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक करणे, विम्याचे हप्ते भरूनही रक्कम मिळत नाही, विमा काढूनही त्याचा काहीच उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे अशा अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. पीक विमा योजनेचे काम योग्य पद्धतीने सुरु नसल्याचे लक्षात आल्यानंतर मागील काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीक विम्या संदर्भात शंका उपस्थित केल्या होत्या.
त्यानंतर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेनेच्या चांडक प्लाझा या कार्यालयात शेतकरी पीक विमा केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यानंतर नांदगाव येथील शेतकरी सुसंवाद मेळाव्यात बोलतांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीक विमा कंपन्यांनी या योजनेत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच पुढील आठ दिवसात पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना न दिल्यास विमा कंपन्यांच्या कार्यालयाला कुलूप लावण्याची घोषणा केली होती.
त्यानुसार तालुक्यात शिवसेना पक्षाच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकऱ्यांशी संपर्क करून पीक विम्याची माहिती घेत फॉर्म भरून घेत आहे.यासाठी तालुक्यात नवीन तहसील कार्यालय, साकोरा, वेहेळगाव, बाणगाव, न्यायडोंगरी, बोलठाण, भालूर, मनमाड आदी ठिकाणी पीक विमा केंद्रे सुरु करण्यात आले आहे.
तालुक्यातील ज्या शेतकरी बांधवांनी मागील वर्षी पिक विमा काढलेला असतांनाही आजपावेतो त्यांना कुठलाही परतावा मिळालेला नाही अशा वंचित असलेल्या शेतकरी बांधवांनी या शेतकरी पीक विमा मदत केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी यावेळी केले.
Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!