Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नांदगाव : विजेच्या धक्क्याने म्हशींचा मृत्यु

Share

नांदगाव। प्रतिनिधी
नांदगाव तालुक्यातील जामधरी येथील संजय पिरनाईक यांच्या तीन म्हशी शेतात चरण्यासाठी जात असतांना अचानक वीजेच्या धक्क्याने मृत्यु झाला असल्याची घटना घडली आहे. परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जामधरी येथील संजय वेडूजी पिरनाईट यांच्या तीन म्हशी चरण्यासाठी जात असतांना वीजप्रवाह सुरू असलेली अचानक एक वाहिनी पडल्याने तीनही म्हशीचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झालाआहे.

अंदाजे २ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी जी.एस.जाधव यांनी या म्हशीचा वीजेच्या धक्क्याने मृत्यु झाला असल्याचे घोषित केले आहे. तलाठी जी.एस.ननई यांनी पंचनामा करून पुढील कारवाईसाठी तहसीलदार मनोज देशमुख यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. शासनाच्या वतीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!