अज्ञात इसमाकडून वृद्ध महिलेला मारहाण

0

नांदगाव। प्रतिनिधी : वृद्ध महिलेला मारहाण करीत जखमी करून ३३००० हजारांचा ऐवज लंंपास केल्याची घटना तालुक्यातील चांदोरा येथे घडली आहे. याप्रकणी नांदगाव पोलीस ठाण्यात अज्ञात दोन इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदगाव तालुक्यातील चांदोरा येथील शकुंतलाबाई दत्तु चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गावातील भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री १:३० वाजता घरी आले. रात्री झोपेत असतांना दरवाजा ठोकण्याचा आवाज आला. तर दोन इसमांनी दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. मला अमानुषपणे मारहाण करत घरातील दागिन्यांची चोरी केली. तसेच माझ्या अंगावरील ३०,००० किमंतीचे दागिने व घरातील ३००० रुपये ऐवज मला मारहाण करून पोबारा केला.

याप्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांच्या विरोधात भादवी ३९४, ४५२, ३४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास नांदगाव पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

*