Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नांदगाव : डम्पर मागे घेण्याच्या नादात कामगार युवकाचा मृत्यू

Share

नांदगाव । चाळीसगाव जवळ खकडी येथे रस्त्याचे काम चालू असताना डंपर मागे घेण्याच्या नादात मागे उभे असलेल्या युवक दाबला गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बाळकृष्ण डोमाडे (वय १९) असे मृत झालेल्या कामगार युवकाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव जवळ खकडी येथे रस्त्याचे काम चालू असताना रात्रपाळीत कामावर असलेल्या पिंपरखेड ता.नांदगाव येथील बाळकृष्ण हा खडीने भरलेल्या डंपरच्या मागे उभा होता. यावेळी ड्रायव्हरने डंपर मागे घेतला असता त्याखाली सापडून तो दाबला जाऊन जागेवरच गतप्राण झाला. इतर कामगारांच्या लक्षात येताच त्याला चाळीसगाव येथे हलविण्यात आले. परंतु त्याची प्राणज्योत मालवलेली होती.

चांदवड-जळगांव महामार्गाचे काम नांदगाव ते चाळीसगाव दरम्यान प्रगतीपथावर असून दिवस रात्र काम चालू आहे. काम पूर्ण करण्याच्या घाई गडबडीत एम.बी.डब्ल्यू या रस्त्याचे काम करत असलेल्या कंपनीचे कामगारांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. या घाईने पिंपरखेड येथील बाळकृष्ण राजेंद्र डोमाडे या युवकाचा बळी घेेतला आहे.

दरम्यान दोन महिन्यांपूर्वी देखील याच गावातील तरुण कामावर असतांना जळगाव खुर्द प्लॅन्ट वर साठवलेले बायो डिझेल ट्रॅक्टर मध्ये भरत असताना मोटर च्या ठिणग्या उडून स्फोट झाल्याने कुंदन गंगाधर सानप हा युवक (वय १९) भाजून मृत्युमुखी पडला होता. यामुुळे कामगारांच्या सुरक्षिततेेेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!