Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या हिट-चाट

Video : गोदामाईच्या स्वच्छतेसाठी होणार ‘विश्वविक्रम’

Share

नाशिक । प्रतिनिधी
दक्षिण गंगा म्हणून संबोधल्या जाणार्‍या गोदावरी नदीचे वाढलेले प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नागरिकांप्रती नदीविषयी प्रेम, आदरभाव निर्माण व्हावा, यासाठी हे गोदा मॉ तू बहती रहे…या आशयाचे गीत पद्मश्री ख्यातनाम गायक शंकर महोदवन यांनी गायले आहे. एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिकमध्ये ते आले असताना त्यांनी गोदापूजन केले. यानंतर याबाबत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी सांगितले.

जलतज्ञ राजेंद्र सिंह, नमामी गोदा फाऊंडेशनचे राजेश पंडित सरसावले आहेत. नदीप्रदूषण कमी व्हावे यासाठी त्यांनी सहा राज्यांत वेगवेगळे उपक्रम हाती घेत ते सातत्याने जनजागृती करत आहेत.

या उपक्रमाचाच एक भाग म्हणून मुंबईतील क्रिएटिव्ह हेड काजल शहा यांच्यासह तेजस-राहुल यांच्या एका समूहाने थेट नदी स्वच्छतेसाठी राष्ट्रगीत तयार केले होते.

राष्ट्रगीत शंकर महादेवन यांच्या गाण्याच्या शैलीसारखे साकारले असल्यामुळे सर्वप्रथम ते महादेवन यांना ऐकविण्यात आले. गाण्याचे बोल जेव्हा महादेवन यांनी ऐकले तेव्हा अनेक वर्षांनी एवढा छान आवाज ऐकल्याची प्रतिक्रिया खुद्द महादेवन यांनी दिली.

कधीही मोठ्या पडद्यावर न आलेल्या वीस ते पंचविशीतील नव्या उमेदीच्या मुंबईतील पाच मुलांच्या समूहाने गीत गायले होते. त्यानंतर या मुलांना सोबत घेऊन शंकर महादेवन यांनी हे गाणं संगतीबद्ध केले. मुंबईतील काजल शाह यांनी या गाण्याच्या क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम बघितले आहे. तर तेजस काळे आणि राहुल खाडे (तेजस राहुल) हे या राष्ट्रगीताचे म्युझिक डायरेक्टर होते.

गाण्याचे लिरिक्स पराग ओझा यांचे आहेत. म्युझिक अ‍ॅरेंजर राहुल खाडे आणि तेजल वराडकर यांनी केले असून स्क्रॅच ट्रॅक सिंगरचे काम तेजिंदर सिंग यांनी बघितले होते.

हे गीत शंकर महादेवन यांना ऐकविण्यात आल्यानंतर त्यांनी स्वतः या मुलांसोबत हे गाणे गायले. लवकरच हे गीत रिलीज होणार असल्याचे महादेवन यांनी सांगितले.

दरम्यान, हे गीत सहा राज्यातील जवळपास 10 लाखांपेक्षा विद्यार्थी एकाच वेळी गाणार आहेत. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या राष्ट्रगीताची नोंद करण्यात येणार असून प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक दिग्गजांना उपक्रमात समाविष्ट करून घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

यह मेरा सौभाग्य है की…
गोदावरीचे प्रदूषण कमी करण्यासाठी नमामी गोदा फाऊंडेशनच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या उपक्रमाचा भाग मला होता आले. नाशिकमध्ये आल्यानंतर मला गोदापूजन करून खर्‍या अर्थाने मी या उपक्रमात सहभागी झालो आहे. इतरही गायक हे गाणं गाऊ शकले असते, मात्र माझीच निवड यासाठी करण्यात आल्याने मला मनस्वी आनंद होत आहे.
-पद्मश्री शंकर महादेवन, ख्यातनाम गायक

उपक्रमाची व्याप्ती वाढली
समाजाचे गोदावरीसोबत जे नातं तुटलं आहे. ते नातं जोडण्यासाठी नमामी गोदा फाऊंडेशन सहा राज्यांत काम करत आहेत. कालपासून अधिकृतरित्या शंकर महादेवन हे स्वतः गोदापूजन करुन जोडले गेले आहेत. जलतज्ञ राजेंद्रसिंह यांनी गोदावरीचे पावित्र्य राखण्यासाठी सहा राज्यात मोठा परिवार बनवला असून एक-एक करत असंख्य गोदाप्रेमी या उपक्रमात सहभागी होत असल्याने व्याप्ती वाढली आहे.
-राजेश पंडित, नमामी गोदा फाऊंडेशन, नाशिक

पाण्यावरून होऊ घातलेले युद्ध टळावे म्हणून…
आई गेल्यानंतर गोदामाईच माझी आई झाली. तेव्हापासून मी गोदावरीच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करते आहे. गोदावरी सर्वांची आई आहे. आई असंख्य जनतेची तहान भागवते. तिला अस्वच्छ ठेवून परवडणारे नाही. तसेच येणार्‍या काळात पाण्याचे युद्ध टळावे. जे आधी झाले ते विसरुन नव्या पिढीला सोबत घेऊन स्वच्छ गोदावरी साकारण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
-काजल शाह, क्रिएटिव्ह हेड, मुंबई

राष्ट्रगीत यासाठी की…
राष्ट्रगीत गाताना सर्वजण जसे जागेवर उभे राहतात, सावध होतात. त्यामुळे राष्ट्राप्रती प्रेम निर्माण होते. याठीच ही संकल्पना मांडण्यात आली. यातून लहान मुलांना नदीप्रती आदरभाव निर्माण होईल, ही मुलंच पुढे जाऊन नदीला स्वच्छ राखण्याचे धडे आपल्या पालकांना देतील.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!