Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

विषमुक्त भाजीपाला उत्पादन जनजागृतीसाठी मविप्रचे कृषी बास्केट अँप

Share

नाशिक : शेतीमधून उत्पादन वाढीसाठी रासायनिक औषधांच्या वापरामुळे सध्या भारतात कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे.तसेच फळबागा आणि भाजीपाला उत्पादनासाठी आजकाल प्रचंड मोठ्या प्रमाणावर रसायनांच्या वापराने आपण पाणी आणि सुपिक जमिनीचा पोत नासवत आहे.

ह्याच गोष्टींचा गांभीर्याने विचार करून मविप्र संचलित कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वतीने गेल्या २ वर्षापासून विषमुक्त शेतीचा प्रयोग यशस्वीपणे राबविला जात आहे. ह्याच प्रात्यक्षिक प्रयोगाच्या माध्यमातून नाशिकमध्ये विषमुक्त शेतीविषयी सामाजिक जनजागृतीचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

सदर उपक्रमांतर्गत कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थी कृषीदूत म्हणून व शिक्षक,सेवकवृंद यांच्या मार्गात उत्पादित केलेला विषमुक्त भाजीपाला गंगापूर रोड आणि आजूबाजूच्या परिसरात विक्रीसाठी उपलब्ध केला जात आहे. विषमुक्त भाजीपाल्याची वाढती मागणी लक्षात घेता ह्या उपक्रमाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड म्हणून मविप्र कृषी तंत्रनिकेतन, केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विषमुक्त भाजीपाला ‘ मविप्र कृषी बास्केट ‘ या नवीन अँपचा शुभारंभ करण्यात आला.

मविप्र संस्थेचे माजी सरचिटणीस स्व.डॉ.वसंतराव पवार यांच्या स्मृतीदिनी संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार, संचालक भाऊसाहेब खताळे, नाना महाले, सचिन पिंगळे यांच्या हस्ते सदरअँपचे लोकार्पण करण्यात आले.

मविप्र कृषी बास्केट ‘ या अँप मार्फत कृषी तंत्रनिकेतनचे विद्यार्थी घरपोच भाजीपाला पोहचविण्याचे काम करतील तसेच सदर उप्क्रमाविषयीचे अभिप्राय नोंदवतील. सदर अँप शिक्षणाधिकारी डॉ एन.एस.पाटील यांच्या संकल्पनेतून तयार केलेले असून अँप बनविण्यासाठी केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील माहिती व तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ.विजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कु.आदित्य मराठे, कु.दर्शन जोशी, कु.पवन वाणी, कु.हेमंत अहिरे या विद्यार्थ्यांनी काम पाहिले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!