Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : मुथुट दरोडा प्रकरण : सॅम्युअलला गोळ्या घालणारा परमेंदर सिंग जेरबंद

Share

नाशिक : मुथुट फायनान्स दरोडा गोळीबार प्रकरणात सहा नव्हे तर अकरा जणांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. संजू सॅम्युअलची हत्या करणारा परमेंदरसिंग याला आज पहाटे कलोदरा उत्तरप्रदेश येथून नाशिक पोलिसांनी अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. याच प्रकरणात दोन दिवसापूर्वी मुख्य आरोपी जितेंद्र बहादूर सिंग यास अटक केली होती.

पप्पू उर्फ अनुज साहू, जितेंद्र  बहादूर सिंग, आकाश विजय बहाद्दूर सिंग, परमेंदर सिंग, सुभाष गौड यांची नावे यापूर्वीच निष्पन्न झाली होती. यासह त्यांना सक्रिय मदत करणारा उमेश तिवारी, पप्पू, सुबोध रॉय, मांझी, राहुल, गुरू (पूर्ण नाव माहीत नाही) अशी इतर संशयितांची नावे असून ते सर्व सराईत गुंड आहेत. तसेच ते उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल येथील राहणारे असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या अकरा जणांनी चार महिन्यापूर्वी या लुटीचा कट रचून १४ जूनला तो अमलात आणला. त्यांनी पूर्ण तयारीनिशी हा दरोडा टाकला. यासाठी एक आयशर टेम्पो, तीन दुचाकी तसेच सहा पिस्तूल व ६० जिवंत काडतुसे वापर केल्याचे समोर आले आहे. याप्रसंगी अनपेक्षित तीव्र विरोध केल्याने संजू सॅम्युअल याला परमेंदर सिंग व आकाश सिंग या दोघांनी जवळून गोळ्या घातल्याचे कबुली परमिंदरने दिली आहे.

तसेच अयशस्वी झाल्यानंतर पळून जातांना दिंडोरी येथे पोलीस असल्याने त्यांनी तीन दुचाकी रामशेज जवळ सोडून समवेत आणलेल्या आयशर टेम्पोमधून सुरतच्या दिशेने पलायन केल्याचे परमिंदरच्या चौकशीतून समोर आले आहे.

या दरोड्यातील सराईतांच्या कष्टपूर्वक मुसक्या आवळणाऱ्या गुन्हे शाखेच्या तीन पथकांना प्रत्येकी सत्तर हजार असे २ लाख १० हजार रुपये रिवॉर्ड नांगरे पाटील यांनी जाहीर केले आहे. या रिवार्डची संपूर्ण रक्कम संजू सॅम्युअलच्या कुटुंबियांना देणार असल्याची घोषणा गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त आर. आर. पाटील यांनी यावेळी केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!