Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मुथूट दरोड्यात पलायनासाठी वापरलेला टेम्पो जप्त

Share

नाशिक ।  प्रतिनिधी
उंटवाडी रोडवरील मुथूट फायनान्स गोळीबार व दरोड्याच्या गुन्ह्यात संशयितांनी पळून जाण्यासाठी वापर केलेला 6 लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो पोलिसांनी सूरतमधून जप्त केला आहे. लुटीचे सोने याच आयशर टेम्पोतून सूरतकडे नेण्याचे संशयितांचे नियोजन होते. (जीजे 05 बीयु 8651) क्रमांकाचा हा टेम्पो असून तो दरोड्यातील मुख्य सूत्रधार जितेंद्रसिंग विजय बहादूर सिंग राजपूत याच्या मालकीचा असल्याचे पोलीस तपासात उघडकीस झाले.

उंटवाडी रोडवरील मुथूट फायनान्स कार्यालयावर 14 जून रोजी दरोड्याचा प्रयत्न झाला होता. सहा दरोडेखोरांनी सशस्त्र तयारीनिशी दरोड्याचे नियोजन केले परंतु, त्यांना कार्यालयातील अभियंता सॅजू सॅम्युअल याने जोरदार प्रतिकार केला. मात्र, यात संशयितांनी गोळ्या झाडून त्याची हत्त्या केली. दरोड्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर पळ काढलेल्या सहा संशयितांनी तीन दुचाक्यांवरून दिंडोरीरोडच्या दिशेने पलायन केले.

दरोडेखोरांच्या नियोजनानुसार, दरोडा यशस्वी झाला असता तर लुटीचे सोने नेण्यासाठी आयशर टेम्पोचा (जीजे 5 बीयु 8651) वापर केला जाणार होता. त्यासाठी सदरचा टेम्पो पेठरोडवर थांबविण्यात आला होता. त्यात सिमला मिरचीचे कॅरेट ठेवण्यात आले होते. मात्र दरोडा अपयशी ठरल्याने दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी रामशेजच्या पायथ्याशी दुचाक्या सोडल्या आणि त्याच टेम्पोतून सूरतकडे पलायन केले होते.

याप्रकरणी संशयित जितेद्रसिंग यास सूरतला घेऊन गेल्यानंतर चौकशीतून सदरचा आयशर टेम्पो त्याच्याच मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले तसेच सूरतमधील त्याच्याच कार्यालयाच्या बाजूला आयशर टेम्पो लपवून ठेवल्याचेही आढळून आले. सदरचा 6 लाख रुपयांचा टेम्पो जप्त करण्यात येऊन नाशिकला आणण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे -पाटील, उपायुक्त अमोल तांबे, पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांच्या मार्गदर्शनाखाली अंबडचे पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, उपनिरीक्षक विकास लोंढे, तुषार चव्हाण, संजीव जाधव, मारुती गायकवाड, अविनाश देवरे, धनंजय दोबाडे, संभाजी जाधव, मनोहर कोळी, मच्छिंद्र वाघचौरे यांनी ही सदरची कामगिरी केली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!