Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मुथूट प्रकरण : संजू सॅम्युअल्सच्या वारसांना ३५ लाखांची मदत; पत्नीस नोकरी

Share

नाशिक : शहरातील मुथूट फायनान्सवर सशस्र दरोडा पडल्यानंतर सॅम्युअल्स साजिथ याने स्वतःचा जीव धोक्यात टाकून इतर नागरिकांचे व बँकेतील कर्मचाऱ्यांचे प्राण वाचविले व गुन्हेगारांशी झुंज देतांना मृत्यू झाल्याने मुथूट फायनान्सने दखल घेत सॅम्युअल्सच्या पत्नीच्या नावे ३५ लाख रुपये डिपॉझिट केले आहेत.

मुथूट फायनान्सकडून सॅम्युअल्सच्या पत्नीच्या नावावर ३५ लाख डिपॉझिट व संस्थेच्या पथ्यनाउतिथा येथील हॉस्पिटल मध्ये नोकरी तसेच सॅम्युअल्सला मिळत असलेला पगार हा पूर्णपणे चालू राहणार असल्याची माहिती मुथूट फायनान्स चे डी.जी.एम संजीव आनंद यांनी दिली.

तसेच काही दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांकडूनही सॅम्युअल्सच्या कुटुंबियांना मदत निधी देण्यात आला होता. दरम्यान नाशिक पोलिसांनंतर आता मुथूट फायनान्सकडून सम्युअल्सच्या धैर्याची दखल घेण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!