Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक महापालिकने परिवहन सेवेचा निर्णय जबाबदारीने व अभ्यास करुन घ्यावा : भुजबळ

Share

मुंबई | प्रतिनिधी

नाशिक महापालिकने शहराच्या परिवहन सेवेचा निर्णय जबाबदारीने व अभ्यास करुन घ्यावा, असे अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. नाशिक महानगरपालिका परिवहन विभागाची सादरीकरण व सद्यस्थिती याचा आढावा घेण्यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भुजबळ बोलत होते. यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे व अधिकारी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, शहराच्या विकासाला विरोध नाही परंतू महापालिकेने परिवहन सेवेचा निर्णय घेताना अभ्यास करुन व जबाबदारीने घ्यावा. मुलभूत सुविधेसाठी साधारण 80 कोटी रुपये खर्च येणार आहे तसेच वार्षिक 55 कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. हे सर्व परत एकदा महापालिकेच्या सर्व पदाधिकऱ्यांना समजवून सांगा. तसेच यासाठी शासनाकडून अनुदान मिळणार नाही कारण मदत करायची तर सर्व शहरातील परिवहन सेवांसाठी मदत करावी लागेल.

शिंदे म्हणाले, नाशिक शहराच्या बससेवेसाठी आवश्यक ते उत्पन्न मिळविण्यासाठी इतर महापालिकांच्या बससेवांचा अभ्यास करुन प्रस्ताव सादर करावेत. बससेवेसंबंधी लवकरच पुन्हा एकदा सविस्तर आढावा बैठक घेण्यात येईल. यावेळी नाशिक महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक शहर बससेवासंबधी सादरीकरण केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!