Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : आता मॉल्स-मल्टिप्लेक्स येथे ‘फ्री’ कार पार्किंग

Share

नाशिक : रस्त्यांवर बेशिस्त पद्धतीने केलेल्या पार्किंगमुळे पादचार्‍यांसह वाहतुकीमध्येहीअडथळा निर्माण होतो. मात्र आता यावर तोडगा काढण्यासाठी शहरांमध्ये मॉलमध्ये मोफत पार्किंगची सोय सुरू करण्यात आली आहे. नाशिक महापलिकेत अशाप्रकारचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

दरम्यान मुंबई, पुणे, नाशिक शहरांसारख्या मेट्रो सिटीमध्ये आजकाल वाहनांची संख्या वाढल्याने ट्राफिकची समस्या बिकट होत चालली आहे. यामुळे मोफत पार्किंगचा उपाय नाशिक महानगरपालिकेने केल्याने काहीअंशी वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. याआधी पुणे महानगरपालिकेने मोफत पार्किंगचा निर्णय घेतला होता.

मागील आठवड्यात पुणे शहरात आणि आता नाशिकमध्ये मॉलमध्ये वाहनांना मोफत पार्किंग देण्यात येणार आहे. महापौर रंजना भानसी यांनी हा प्रस्ताव मंजूर केला आहे. शहरातील सर्व मॉल्सना नोटिसा बजावून त्यांना नागरिकांसाठी विनाशुल्क पार्किंग करण्याचे आदेश द्यावेत, असे निर्देशही महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.

शहरात स्मार्ट सिटीची कामे चालू असल्याने ठिकठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून शहरातील वाहतूक व्यवस्था वेगळी केली आहे. यामुळे शहरातील महत्वाच्या ठिकाणी ट्रफिक जॅम होण्याच्या घटना वाढत आहेत.

परिणामी ही समस्या टाळण्यासाठी वाहनांच्या परिकींगची सोय होणे गरजेचे होते. दरम्यान शहरातील सर्व मॉल्समध्ये मोफत पार्किंग करण्याचा निर्णय घेतला असून त्याला महासभेने मंजुरी दिली. त्यामुळे शहरातील वाहन पार्किंगची समस्या तसेच शहरातील ट्रॅफिक जॅम कमी होण्यास मदत होणार आहे.

‘पार्किंग फ्री’ निर्णयाचे स्वागत आहे. खरे बघता हा निर्णय आधीच व्हायला हवा होता. अलीकडेच मॉल मध्ये खरेदीला जाणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. त्यात तरुणांची संख्या लक्षणीय आहे. पार्किंग फ्री मुळे मॉल खरेदीला अधिकच चालना मिळेल यात शंका नाही.
-अक्षय कोठावदे, मेडिकल रिप्रेझेंटेटिवज्

पार्किंग फ्री केल्याबद्दल सर्वांना अभिनंदन, पुण्या नंतर तत्काळ आपल्याकडेही पार्किंग फ्री चा निर्णय घेतला जाईल अशी आशा होती परंतु ह्या गोष्टीस मोठ्या प्रमाणावर विलंब झाल्याचे दिसून येते. नाहक ग्राहकांना पार्किंग फीच्या नावाखाली लुटले जात होते. हा प्रकार बऱ्याच वर्षांपासून सुरु होता. शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे.
-हर्षद खुरखुटे, विद्यार्थी

वास्तविकता निर्णय जरी पास झाला असेल तरी हि पार्किंग शुल्क घेणे सुरु आहे. ह्या संबंधी मॉलच्या अधिकाऱ्यांना विचारले असता आदेश असून आमच्या पर्यंत पोहचला नाही लेखी आदेश आल्यावरच आम्ही योग्यती योजना करणार आहोत असे उत्तर दिले. ह्या निर्णय लवकरात लागू व्हावा हीच अपेक्षा.
-संतोष भुसारे, डिलिव्हरी बॉय

‘पार्किंग फ्री’ निर्णय जरी योग्य असला तरी याचे काही प्रमाणात तोटे देखील आहेत. सध्याला पैसे आकारण्यात येत आहेत म्हणून पार्किंग ठिकाणी सेक्युरीटी गार्ड व सीसीटीव्ही देखील कार्यन्वित आहेत. आता पार्किंग फ्री झाल्यास तेथे विनाकारण वाहने पार्क करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असणार आहे. तसेच चोरीच्या घटना देखील होऊ शकतात यात शंका नाही.
-सचिन कुळकर्णी, विद्यार्थी

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!