मनपाचा अल्टिमेटम : नाशिकमध्ये 47 हजार ग्राहकांकडे 45 कोटी थकित; पैसे भरा अन्यथा मालमत्ता करणार जप्त

0
नाशिक । महापालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांची यादी तयार केली असून त्यांना थकबाकीप्रकरणी अंतिम नोटीस बजावण्यात येणार आहे. नोटीसा देवूनही थकबाकी न भरल्यास थेट मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. शहरात 47 हजार थकबाकीदारांकडे जवळपास 45 कोटींची थकबाकी आहे. उद्यापासून नोटीसा पाठविल्या जाणार आहेत.

महापालिकेने उत्पन्न वाढविण्यासाठी मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसुलीवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पाणीपटटी थकविणारयांविरोधात मोहीम हाती घेतल्यानंतर आता मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेने पाउलं उचलली आहे. गेल्या वर्षीची 31 कोटी 67 लाख आणि चालू वर्षातील बड्या थकबाकीदारांकडे असलेली 12 कोटीं 88 लाखांची थकबाकी वसुलीसाठी पालिकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

गेल्या वर्षीचे आणि सध्याचे थकबाकीदार मिळून 47 हजार 415 मालमत्ताधारकांना अंतिम नोटीस काढण्याची तयारी केली आहे. या सर्वांकडे जवळपास 44 कोटीं 56 लाखांची थकबाकी असून हे सर्व थकबाकीदांकडे दहा हजारापेक्षा जास्तीची थकबाकी आहे.

या सर्व थकबाकीदारांना येत्या 1 डिसेंबरपासून अंतिम नोटीसा बजावल्या जाणार आहेत.त्यांना थकबाकी जमा करण्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टीमेटम दिला जाणार आहे. अल्टीमेटम नंतरही थकबाकी भरली नाही तर थेट मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

नव्या मिळकतींकडे लक्ष : नव्याने करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात सुमारे 58 हजार मालमत्ता नव्याने आढळून आल्या आहेत.त्या सर्व मालमत्तांची छाननी पूर्ण झाली असून त्यांनाही वसुलीसाठी नोटीसा पाठविण्याचे काम सुरू झाले आहे. ज्या मालमत्तांधारकांकडे पालिकेेचा भोगवटा प्रमाणपत्र नाही त्या,सर्वांकडून गेल्या सहा वर्षापासूनचा मालमत्ता कर वसुल केला जाणार आहे. तर ज्यांच्याकडे भोगवटा प्रमाणपत्र आहे,परंतु त्यांची नोंदणी झालेली नाही अशा मालमत्ता धारकांकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळवेल्या तारखेपासून वसुलीच्या नोटीसा पाठविल्या जाणार आहेत.त्यामुळे यातूनही पालिकेला 50 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळण्याची आशा आहे.

कारवाईमुळे 10 कोटींचा महसूल वाढला : गेल्या दोन महीन्यात पालिकेने पाणीपट्टीच्या 67 हजार थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या होत्या.त्यांच्याकडून आठ कोटी 78 लाखांची अधिकची वसुली झाली आहे.

पाणीपट्टीची नियमीत वसुली 23 कोटी 58 लाख झाली असून पालीकेच्या कारवाईमुळेे गेल्या वर्षापेक्षा दहा कोटींनी अधिक वाढ झाली आहे आतापर्यंत पालिकेच्या तिजोरीत 59 कोटी 19 लाखांची वसुली झाली आहे. परंतु तरीही चालू वर्षात जवळपास 50 कोटींची थकबाकी आहे.तर गेल्या वर्षीची 31 कोटींची थकबाकी आहे.

LEAVE A REPLY

*