Photo Gallery : आयुक्त तुकाराम मुंढेंचा पंचवटीत पाहणी दौरा; अधिकाऱ्यांची झाडाझडती

खासगी भूखंडांवर कचरा आढळल्यास होणार कारवाई

0
देशदूत डिजिटलसाठी सर्व फोटो अमोल गंभीरे, देशदूत पंचवटी 
पंचवटी | वेळ सकाळी ९.३० वाजेची. नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अचानक रामवाडी पंचवटी परिसरातील गोदापार्क परिसरात पाहणी दौरा केला. यावेळी खासगी भूखंडांवर कचरा आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देश देत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

रामवाडी पुलानाजीक कचऱ्याचे प्रमाण आढळून आल्यामुळे महापालिकेचे पंचवटी विभागीय निरीक्षक संजय गोसावी यांना धारेवर धरत योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.

गोसावी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचीही यावेळी तुकाराम मुंढे यांनी झाडाझडती घेतली. परिसरात कचरा जाळणाऱ्या व्यक्तीलाही यापुढे कचरा न जाळण्याच्या सूचना स्वतः मुंढे यांनी दिल्या.

आयुक्त मुंढे यांनी रामवाडी पुलानजीक भेट दिली, तेव्हा स्मार्ट सिटी आणि गोदापार्क सुसोभिकरण करण्यासाठी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या क्रिसिल कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून नकाशाद्वारे गोदापार्कविषयी माहितीदेखील मुंढे यांनी जाणून घेतली.

यावेळी मुंढे यांच्यासोबत अधिकार्यांचा मोठा जत्थाच होता. कचरा, ड्रेनेज, उघड्या गटारी, खासगी भूखंडावरील कचरा यावर तोडगा काढण्याच्याही सूचना केल्या.

खासगी भूखंडावर कचरा केल्यास होणार कारवाई : मुंढे यांनी पंचवटी परिसरात अचानक भेट दिल्यानंतर त्यांना येथील खासगी भूखंडांवर कचरा आढळून आला. त्यानंतर पंचवटी विभागीय अधिकाऱ्यांना संबंधित जागामालकाविरोधात कारवाईदेखील करण्याच्या सूचना यावेळी मुंढे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे आता खासगी भूखंड मालकांना आता काळजी घ्यावी लागणार आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या भेटीची काही क्षणचित्रे

LEAVE A REPLY

*