Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मुंबई नाका : दुभाजकावर कार आदळून एक ठार ०४ गंभीर

Share

नाशिक। भरधाव चारचाकी उड्डाणपुलावरील दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात १ ठार तर चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.३०) पहाटे पाथर्डीफाटाजवळील उड्डाणपुलावर घडली.

देवंद्र प्रतापसिंग भानुप्रतापसिंग(३१, रा. आदिलनगर, लखनौ) असे या अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे तर जितेंद्रसिंग, सरिता चव्हाण, राखीसिंग व आयुष सिंग हे गंभीर जखमी आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भानुप्रतापसिंग व सर्व जखमी हे लखनौ येथून नाशिककडे येत असताना बुधवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील पाथर्डीफाटा येथील उड्डाणपुलावर त्यांची भरधाव इनोव्हाकार (क्र.यु.पी. ३२, एमएम २०५०) चे नियंत्रण सुटून ती रस्ता दुभाजकावार आदळली. यामध्ये भानुप्रताप तसेच इतर ४ गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारांसाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान उपचार सुरू असताना भानुप्रतापचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून घोषीत केले. तर जखमी चौघांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!