Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video | मुंबईनाका : ऑनलाईन गंडा घालणाऱ्या टोळीला सिनेस्टाइल अटक

Share

नाशिक : ऑनलाईन गंडा घालणाऱ्या टोळीला वडाळा येथे अटक करण्यात आली आहे. शहरातील वाहतूक पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत कारवाई केली आहे.

अधिक माहिती अशी कि, वडाळा येथे नाशिकस्थित असणाऱ्या एका वृत्तवाहिनीचा कर्मचारी वृत्त मिळवण्याकरिता गेला होता. यावेळी एका चारचाकी वाहनावर ‘त्या’ वाहिनीसंदर्भात लोगो दिसून आला. यावेळी कर्मचाऱ्याने कुतूहलापोटी गाडीकडे जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान गाडीत असणाऱ्या दोघांनी पोबारा केला.

 

वाहिनीच्या कर्मचाऱ्यास संशय आल्याने त्या वाहनाचा पाठलाग केला. तसेच शहरातील वाहतूक पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. यावेळी वाहतूक पोलिसांनी पंचवटी येथील मार्केड यार्ड जवळ या संशयितांच्या गाडीला कट मारत पकडण्यात आले.

यावेळी संशयितांकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून हा मुद्देमाल चोरीचा असण्याची शक्यता आहे. तसेच संशयितांकडून मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!