Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मुंबई नाका : दुचाकी कंपाऊंडला धडकून चालक ठार

Share
नांदगाव : पोटच्या मुलीचा बापासमोर मृत्यू तर पत्नीने दवाखान्यात सोडला जीव Nandgoan Wife and Daughter Dead in Eicher-Motorcycle Accident

नाशिक :  मध्यरात्रीच्या सुमारास सिटी सेंटर मॉलकडून गोविंदनगरकडे जाणार्‍या भरधाव वेगातील दुचाकी इमारतीच्या कंपाऊंडला धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली.

या अपघातप्रकरणी मयत चालकाविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश काशिनाथ चौधरी (44, रा. सुमंगल अपार्टमेंट, शांतीपार्क, उपनगर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. दिनेश चौधरी हे रविवारी (दि. 8) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हेल्मेट घालून एमएच-15-बीसी-8259 या क्रमांकाच्य दुचाकीवरून सिटी सेंटर मॉलकडून गोविंदनगरकडे भरधाव वेगात जात होते.

या मार्गावरील कर्मयोगी नगरजवळ त्यांचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्यालगतच्या पिस्क्वेअर इमारतीच्या संरक्षण भिंतीवर जाऊन आदळली. या भीषण अपघातामध्ये त्यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांचे गस्तीपथक त्याठिकाणी पोहोचले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!