आत्महत्या रोखण्यासाठी सोशल मीडिया कधी होणार सज्ज

0

मुंबई : दैनंदिन जीवनात लोक प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा सोशल मीडियावर भेटणं पसंत करतात. त्यात प्रामुख्याने फेसबूक हे सगळ्यात जास्त माध्यम वापरले जाते. सोशल मीडियावरच आपल्या जीवनातील घटना, आपले रोजचे जीवन, अविस्मरणीय क्षण शेअर करतात. आजकाल तर फेसबुकवर मेसेज टाकून आत्महत्या केलेली अनेक प्रकरणे देखील देशात समोर आली होती.

त्यातीलच आजची हि एक घटना लष्कर भरतीत आपली निवड होत नसल्याने नाराज होऊन एका तरुणाने आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना समोर आली आहे. तरुणाने आत्महत्या करताना फेसबुकवर लाइव्ह करत आपल्या आत्महत्येचं कारण स्पष्ट केलं. या दरम्यान २७५० लोक फेसबुक लाइव्ह पाहत होते, मात्र एकानेही त्याच्या कुटुंबाला किंवा पोलिसांना फोन करुन कळवलं नाही.

२०१६ साली अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी फेसबूकने आत्महत्या प्रतिबंधक (सुसाईड प्रिव्हेंन्शन) असे एक नवे टूल विकसित केले होते, भारतात देखील हे टूल लाँच करण्यात आले होते. आत्महत्या वेळीच रोखल्या जाव्यात यासाठी फेसबूकने हे पाऊल उचलले होते. परंतु आजची स्थिती बघता सोशल मीडियाद्वारे आत्महत्या करण्याच्या घटना मध्ये कमी झालेली नसून वाढ झालेली दिसून येते

ज्या व्यक्ती तणावात आहेत, अशा व्यक्ती आत्महत्येचा विचार करत असेल आणि तशा पोस्ट टाकत असेल तर त्या पोस्टचा अंदाज घेऊन हे टूल लगेचच त्या व्यक्तीच्या फ्रेन्ड्सना नोटिफिकेशन पाठवत असे. फेसबूक यूजरच्या पोस्टमध्ये काही विपरीत दिसल्यास ते कळविण्याची सोय या टूलमध्ये करण्यात आली होती, परंतु आज कोणत्याही प्रकारचे संरक्षण सोशल मीडियावर दिसून येत नाही. परिणामी आजच्या घटनेमुळे सोशल मीडिया वरील विश्वासार्हता आणखीच ढासळत चालली आहे.

त्यामुळे या घटना थांबवण्यासाठी पुन्हा एकदा फेसबुक तसेच इतर माध्यमांनी वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

*