Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

‘त्या’ सहाय्यक मोटार वाहन निरिक्षकांना अतिरिक्त पदांवर नोकरी

Share

नाशिक । प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आधी निवड झालेल्या पण समांतर आरक्षणाच्या मुद्द्यावर नंतर निवड रद्द झालेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक (गट क) पदावरील 118 उमेदवारांना परिवहन विभागाने मोठा दिलासा दिला आहे. या 118 उमेदवारांची अतिरिक्त पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे.

एमपीएससीमार्फत सहायक मोटार वाहन निरिक्षक (गट क) पदासाठी परिक्षा घेण्यात आली होती. 31 मार्च, 2018 रोजी लोकसेवा आयोगाने या पदाकरिता 832 उमेदवारांची शासनास शिफारस केली. तथापि, दरम्यानच्या काळात सामान्य प्रशासन विभागाच्या 19 डिसेंबर, 2018 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी आणि समांतर आरक्षणाच्या मुद्यावर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठोने 8 ऑगस्ट, 2019 रोजी दिलेला निर्णयानुसार लोकसेवा आयोगाने सुधारीत निकाल जाहीर केला.

या निकालानुसार आयोगाने 11 सप्टेंबर, 2019 रोजी नव्याने 118 उमेदवारांची शासनाकडे शिफारस केली. त्याचवेळी आधीच्या निकालातील 118 उमेदवारांना यादीमधून वगळण्यात आले. 11 सप्टेंबर, 2019 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शासनाकडे शिफारस केलेल्या सर्व 832 उमेदवारांचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील.

याशिवाय या यादीमधून वगळण्यात आलेल्या 118 उमेदवारांना अतिरिक्त पदावर नियुक्ती देण्यात येईल. न्यायालयाच्या निर्णयास अनुसरून आणि नियमानुसार तसेच मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करून या उमेदवारांना अतिरिक्त पदावर नियुक्ती देण्यात येणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!