Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

‘एमपीएससी’कडून ६९ उमेदवार काळ्या यादीत

Share

नाशिक । भारत पगारे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) मागील 9 वर्षात स्पर्धा परीक्षा देणार्‍या 69 उमेदवारांना ङ्गकाळ्यायादीफ त टाकले आहे. पैकी 23 उमेदवारांवर कायमस्वरूपी कारवाई करण्यात आली असून सन 2011 पासून 25 सप्टेंबर 2019 या 9 वर्षात आयोगाने ही कारवाई केली आहे.

कर सहाय्यक (टॅक्स असिस्टंट) या परीक्षेत गैरप्रकार वा कॉपी करणार्‍या उमेदवारांचा भरणा जास्त असून एमपीएससीने काळ्या यादीत टाकलेल्या उमेदवारांची नावासह यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. आयोग राज्य शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचे काम करते. उपजिल्हाधिकारी, पोलीस-उपअधीक्षक, तहसीलदार, नायब-तहसीलदार, गट-विकास अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, मुख्याधिकारी, आरोग्याधिकारी इत्यादी वर्ग-1 व वर्ग-2 ची पदे यामाध्यमातून भरली जातात.

केंद्र सरकारच्या पातळीवर नागरी सेवा परीक्षा आणि राज्य सरकारच्या पातळीवरची राज्यसेवा परीक्षा यात काही साम्यं आहेत. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणी अशा तीन टप्प्यांमध्ये आयोग परीक्षा घेतो असतो. मात्र काही उमेदवार वेगवेगळ्या पदांसाठी घेतल्या जाणार्‍या परीक्षत गैरमार्ग अवलंबतात. आयोगाने 18 सप्टेंबर 2011 रोजी पोलीस उपनिरिक्षक पदाची मुख्य परीक्षा 2011 मध्ये घेतली. तेव्हा 2 महिला उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना कायमस्वरुपी ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये टाकण्यात आले.

येथून खर्‍या अर्थाने आयोगाने परीक्षार्थींसाठी कडक धोरण अवलंबले. सन 2011 पासून सुरू केलेली ही कारवाई आजही निरंतर सुरू आहे. एमपीएससीने गेल्या 9 वर्षांत 50 उमेदवारांना कायमस्वरुपी काळ्या यादीत टाकले आहे, तर पाच वर्षांसाठी 16 उमेदवारांना डिबार करण्यात आले आहे. काळ्या यादीतील एकूण 69 उमेदवार हे 33 ते 24 वयोगटातील असून 3 वर्षे आणि 7 वर्षांसाठी प्रत्येकी एक-एक उमेदवार डिबार करण्यात आला असून एक वर्षासाठी एका उमेदवाराला डिबार करण्यात आले आहे.

टॅक्स असिस्ंटंट परीक्षेत गैरप्रकार जास्त
कर सहाय्यक परीक्षेत सर्वात जास्त गैरप्रकार झाल्याचे आढळून आले आहे. सन 2014, 2015, 2016 आणि 2017 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत एकूण 44 उमेदवारांनी गैरप्रकार केले आहेत.

7 महिला उमेदवारही ‘ब्लॅकलिस्टेड’
आयोगाने केलेल्या कारवाईत आत्तापर्यंत 7 महिला उमेदवारांनाही ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आले आहे. यातील दोन महिलांनी पोलीस उपनिरीक्षक परीक्षा, 2 महिलांनी कर सहाय्यक आणि तिघींनी दुय्यम सेवा परीक्षेत गैरप्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!