Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाती प्रेमानं जोडली जातात, धाक दाखवून नाही; पक्षांतर करणाऱ्यांना खा. सुळेंचे भावनिक आवाहन

Share

नाशिक : बेरोजगारी, औद्योगिक मंदी, स्मार्ट सिटी च्या समस्या वाढल्या असून नाशकात इतरही समस्या वाढल्या असून या समस्यांची ग्राउंड रिऍलिटी जाणून घेण्यासाठीच दौरा असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी संवाद दिली.

खासदार सुप्रिया सुळे नाशिक दौऱ्यावर असून आज त्यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघात संवाद दौरा घेतला. शहरातील नागरिकांशी संवाद साधतांना त्यां म्हणाल्या कि नाशकात समस्या वाढल्या असून यामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तसेच शहरात होत असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पात फसवेगिरी होत असून एवढा निधी असूनही कामे पूर्णत्वास नाही.

कारखाने बंद पडत आहेत आणि नोकऱ्या खूप उपलब्ध होणार असं मुख्यमंत्री सांगत आहते तर येथे असलेल्या बेरोजगारांचे अर्ज द्या मी मुख्यमंत्र्यांना द्यायला तयार असून त्यांनी जर या उमेदवारांना नोकरीस लावले तर मी त्याचे आभार मानेन अशी त्या म्हणाल्या. पुढे त्या राष्ट्रवादीत नेत्यांच्या पक्षांतरावर म्हणाल्या कि, जाणाऱ्यांबद्दल कटुता नाही, परंतु नेत्यांनी संवेदनशील असावं, जे पक्ष सोडून जाताय, ते परत येणारच आहेत पण हे दडपशाही सरकार असून नाती प्रेमानं जोडली जातात, धाक दाखवून नाही असाही खोचकी टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

यावेळी त्या म्हणाल्या कि, देशातील उद्योग धोक्यात असून यास सरकारी टॅक्स टेररिझम जबाबदार आहेत. त्यामुळे पॉलिसी पुनर्रर्रचना करण्याची आवश्यकता आहे. तसेच मोहिंदर अँड महिंद्रा व एच एल सारख्या कंपन्या कामगार कपात करीत असून कामगारांनी कंपन्यांच्या बाहेर आंदोलन करून उपयोग नाही. त्यामुळे वेळीच सावध होऊन सत्ताधाऱ्यांना खाली खेचण्याचे आवाहनही खा. सुळे यांनी केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!