Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दिल्ली – मुंंबई कॉरिडोरमध्ये नाशिकला स्थान मिळेल : खा. हेमंत गोडसे

Share

नाशिक । प्रतिनिधी
देशपातळीवर नाशिकला डिफेन्स हब म्हणून ओळख मिळवून द्यायची आहे. तसेच दिल्ली-मुंबई कॉरिडोरमध्ये दुसर्‍या टप्प्यात नाशिकचा समावेश व्हावा, यासाठी पाठपुरावा सुरु आहे. नाशिकच्या विमान सेवेला पंख लाभणार असून एअर इंडियाची सेवा देखील सुरू होणार आहे. रेल्वेचे प्रश्न मार्गी लावून पर्यटनाला चालना देत नाशिकच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचे खा.हेमंत गोडसे यांनी सांगितले.

नाशिकने औदयोगिक विकासात झेप घ्यावी, यासाठी काय प्रयत्न कराल ?
– शिलापूर इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबमुळे भविष्यात इलेक्ट्रिक क्षेत्राशी निगडीत नामांकित उदयोग व कंपन्या या ठिकाणी सुरु होतील. पूर्वी टेस्टिंगसाठी कंपन्यांसमोर भोपाळचा एकमेव पर्याय होता. राज्यातील ही पहिली इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब आहे. नाशिकरोड येथील व्हिल रिपेअर कारखान्यामुळे रोजगार निर्मिती होईल. भविष्यात नाशिकला डिफेन्स हब बनविण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे येथील लघु उद्योगांना वर्षभर काम मिळेल. मतदारसंघातील 70 टक्के भाग शहरी आहे. विदर्भातील कंपन्यांना वीज दरात सवलत दिली जाते. विजेचे दर राज्यासाठी समान असले पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करु.

सिन्नर तालुक्यातील दुष्काळ निवारणासाठी कोणती योजना राबवाल ?
– सिन्नरचे भौगोलिक क्षेत्र बघितले तर ते टेकाडावर वसलेले आहे. येथील पर्जन्यमान अल्प आहे. जिल्ह्यातील पश्चिम वाहिनी दमणगंगा – एकदरी व अप्पर वैतरणा – कडवा -देवळी या नद्यांचे सात टीएमसी पाणी देवनदीत लिफ्ट करणार आहे. जेणेकरुन सिन्नरचा दुष्काळाचा प्रश्न मार्गी लागून शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल. शासनाच्या पाहणीत हा प्रकल्प व्यवहार्य ठरला असून त्यांच्या डीपीआरला मान्यता मिळाली आहे. येथील 70 टक्के सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. गोदावरी प्रचंड तुटीचे हे खोरे आहे, असे सर्वांचे मत आहे. मात्र, येतील पावसाच्या प्रत्येक थेंबावर आरक्षण आहे. पाणी नसल्याने पहिल्या टप्प्यात दिल्ली -मुंबई कॉरिडोरमधून नाशिकला वगळण्यात आले होते. मात्र, मराठवाड्याची तहान नाशिक भागवते ही वस्तुस्थिती आहे.

– एअर कनेक्टिव्हीटीत सातत्य राहण्यासाठी काय प्रयत्न कराल ?
केंद्र शासनाच्या ‘उडाण’ योजनेअंतर्गत दिल्ली, मुबंई, पुणे, बंगळुरु, अहमदाबाद, हिंडण यांसह नऊ शहरांशी नाशिक कनेक्ट झाले. मध्यंंतरी जेट एअरवेज कंपनी अडचणीत आल्याने विमानसेवेवर परिणाम झाला होता. मात्र, इतर मार्गावर विमानसेवा सुरु आहे. तसेच येत्या 15 जूनपासून एअर इंडिया व इंडिगो या विमान कंपन्या देखील नाशिकसाठी सेवा सुरु करत आहे. दिवाळीपर्यंत नाईट लॅण्डिगचा प्रश्न मार्गी लागेल. यांसह रेल्वेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरवा सुरु आहे. पंचवटी एक्सप्रेसचे कोच प्रवासासाठी आरामदायी नाहीत, अशी प्रवाशांची तक्रार आहे.

चेन्नई येथे कोच तयार होतात. संबंधित कंपनीकडे याबाबत तक्रार केली आहे. लवकरच नवीन डब्बे पंचवटीला मिळतील. नाशिक – पुणे रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, अधिक जलदगतीने प्रवास संभव आहे का याबाबत तीन पर्यायांवर विचार सुरु आहे. त्याचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर लवकरच या मार्गाला मान्यता मिळेल.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!