Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

खा.डॉ.भारती पवार यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान

Share

नाशिक । प्रतिनिधी
दिंडोरी लोकसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीचे पराभूत उमेदवार बापू बर्डे यांनी भाजपच्या विजयी उमेदवार खा.डॉ.भारती पवार यांच्या निवडीला मुबंई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत आव्हान दिले आहे. लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये विजयी उमेदवारा विरुध्द पिटीशन दाखल होण्याची हि पहिलीच वेळ ठरली आहे. त्यामुळे डॉ.पवार यांच्या अडचणीत भर पडली आहेे.

लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमला विरोध करत बॅलेट पेपरवर निवडणूका घ्यावा, अशी मागणी जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी केली होती. नाशिकमध्येही दिंडोरीचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बापू बर्डे यांनी दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी निलेश सागर यांना निवेदन देत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची विनंती केली होती.

तर आंबेडकर यांनी निवडणुक आयुक्तांची भेट घेत त्यांच्याकडे बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याची मागणी केली होती. दरम्यान निवडणूकीच्या निकालानंतर बर्डे यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रीयेची माहिती संकलित केली. त्यात अनेक बाबी आढळल्याने अखेर त्यांनी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे.

जनप्रतिनिधी कायदा 1950 प्रमाणे निवडीला आव्हान देणार्‍या या याचिकेत बर्डे यांच्या वतीने जेष्ठ विधीज्ञ संदीप रणखांबे हे कामकाज पहात आहेत. उच्च न्यायालयात दि. 12 जुलैला दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर न्यायमूर्ती प्रशासनाचे म्हणने ऐकून घेणार आहेत. त्यानंतरच याचिकेच्या पात्रतेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.या याचिकेत प्रशासनालाही सामनेवाले करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली असुन त्यामुळे निवडणूक विभागाची आता धावपळ सुरु झाली आहे.

उच्च न्यायालयात दाखल करावयाच्या कागदपत्रांची जमवाजमव करण्या सुरुवात झाली असुन याचिका मान्य झाल्यास प्रशासनालाही नामुष्कीला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, या याचिकेमुळे नाशिक जिल्हयातील राजकीय क्षेत्रातही खळबळ उडाली असुन सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!