Type to search

Breaking News देश विदेश नाशिक मुख्य बातम्या

मध्यप्रदेशात भाविकांच्या बसला अपघात; नाशिकमधील तिघांचा मृत्यू

Share

मध्यप्रदेश : मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यात मंगळवारी (११ जून) झालेल्या भीषण अपघातात नाशिक येथील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बसमधील अनेकजण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मृतांमध्ये शिवाजी पांडुरंग बोराडे (पिंपळगाव खांब), सविता भगवंत ढिकले (सय्यद पिंपरी), दशरथ काशिनाथ जाधव (शिंदे गाव) यांचा समावेश आहे.

सविस्तर वृत्त असे कि, मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास नाशिकहून चारधामला जाणाऱ्या बसचा अपघात झाला आहे. नाशिकहून काही प्रवासी चित्रकूटला जात होते. साधारण बसमध्ये 50 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. मध्य प्रदेशमधील विदिशा-सागर रोडवर हा अपघात झाला.

या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बसमध्ये अडकलेल्या काही प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.

नाशिक येथील सर्वज्ञा यात्रा कंपनीची हि बस होती. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. दरम्यान यात्रेनिमित्त उज्जैनला ला असताना ही बस चित्रकूट येथे निघाली होती.

अपघातानंतर जखमींना तात्काळ रुग्नालयात दाखल करण्यात आले असून अन्य जखमींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकड़ा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मृताच्या नातेवाईकांना चार लाख तर जखमींना पन्नास हजारांची मदत जाहीर केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!