Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

कौतुकास्पद : जिल्ह्यातील तीन आदिवासी विद्यार्थ्यांनी केला माउंट एव्हरेस्ट सर

Share

नाशिक : मिशन शौर्य या धाडसी उपक्रमाअंतर्गत जिल्हयातील आदिवासी आश्रमशाळांमधील ०३ आदिवासी विद्वत्तरठ्यानी या मोहिमेत सहभागी होत जगातील सर्वात उंच शिखर असलेले माउंट एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. त्यांचं जिल्हाभरातून कौतुक होत आहे.

महाराष्ट्र राज्य आदिवासी विभाग आयोजित मिशन शौर्य-२ या उपक्रमात राज्यातून अकरा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील ०३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. दरम्यान मिशन शौर्य- २, २०१९ साठी महाराष्ट्रातून 1११००आदिवासी आश्रमशाळेतून क्रीडाक्षेत्रात प्राविण्य असलेल्या तालुका स्तर व जिल्हास्तरावरून, महाराष्ट्र स्तरावर एकूण २०३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक श्री अविनाश देऊसकर व श्रीमती विमला देऊस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद जवळील भोंगिर, हिमालयात, दार्जीलिंग, तसेच सिक्किम, लेह व लद्दाख इत्यादी ठिकाणी सात महिने खडतर प्रशिक्षण देण्यात आले. शारीरिक फिटनेस बरोबरच मानसिक संतुलन ठेवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. अंतिम २०३ विद्यार्थ्यांमधून ११ विद्यार्थ्यांची माऊंट एव्हरेस्ट शिखर चढण्यासाठी निवड करण्यात आली. या अंतिम अकरामध्ये नाशिक जिल्ह्यातील ०३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

यामध्ये अनिल पांडुरंग कुंदे, शासकीय आश्रम शाळा( बोरीपाडा), हेमलता अंबादास गायकवाड, आदिवासी आश्रम शाळा (अलंगुन), मनोहर गोपाल हिलीम, आदिवासी आश्रम शाळा (वाघेरा) या विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट हे शिखर सर करून जिल्हयाची मान अभिमानाने उंच केली आहे. महत्वाचे  म्हणजे,  ‘मिशन शौर्य’ या मोहिमेचे नेतृत्व करण्याचा मान हेमलता गायकवाड नावाच्या अकरावीत शिकणाऱ्या आदिवासी मुलीला मिळाला आहे.

बीड जिल्ह्यातील सुग्रीव मंदे आणि चंद्रपूरच्या सुरज आडे याने पहाटे ३.३५ ला एव्हरेस्टवर पहिला झेंडा फडकवला. चंद्रपूरच्या अंतुबाई कोटनाके आणि नाशिकच्या मनोहर हिलीम याने पहाटे ४.२० वाजता मोहीम पूर्ण केली. तसेच धुळ्याची चंद्रकला गावित, अमरावतीचा मुन्ना धिकार यांनी पहाटे ४.४०वाजता एव्हरेस्ट मोहीम यशस्वी केली. पालघरमधील केतन जाधव आणि नाशिकच्या अनिल कुंदे हे पहाटे ५.१० वाजता पोहोचले. तसेच नाशिकच्या हेमलता गायकवाड एव्हरेस्ट मोहीम यशस्वी करत मोहीम पूर्ण केली.

या सर्व विद्यार्थ्यांना भारतातून नेपाळ येथील लासा या ठिकाणी पाच टप्प्यात चढाई करण्याचे प्रशिक्षण प्रशिक्षण देऊन (दि. २४) रोजी या महाराष्ट्रातील आदिवासी वीरांनी जगातील सर्वात उंच ०८ हजार ८४८ मिटर उंच असलेले माउंट एवरेस्ट शिखरावर भारताचा तिरंगा झेंडा फडकवला आणि इतिहास घडवला.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!