Type to search

Breaking News टेक्नोदूत नाशिक मुख्य बातम्या

दिव्यांगांसाठी मोबाईल शॉप ऑन व्हेईकल

Share

नाशिक । प्रतिनिधी
दिव्यांग व्यक्तींना हरित उर्जेवर चालणार्‍या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल)शासनातर्फे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा पुरेपूर लाभ घेतल्यास स्वावलंबी होण्याचा मार्ग मिळणार आहे.

सन 2018-19 या अर्थसंकल्पात दिव्यांगांंकरिता स्वावलंबी बनविण्यासाठी हरित उर्जेवर चालणार्‍या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली होती.त्या अनुषंगाने याबाबतच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. याबाबतचे शासन परिपत्रक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्याचे सहसचिव ज्ञा.ल.सुळ यांच्या स्वाक्षरीने दि. 10 जून रोजी काढण्यात आले आहे.

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणार्‍या फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेचा उद्देश हा दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचा आर्थिक-सामाजिक पुनर्वसन करणे, सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींनाही त्यांच्या परिवार, कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे. हा मुख्य उद्देश आहे.

योजनेचे स्वरुप
फिरत्या वाहनावरील दुकानाकरिता तीन लाख 75 हजार प्रति लाभार्थी कमाल अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी निवडण्यात येणार्‍या संस्थेने वाहनाची देखभाल व दुरुस्ती करणे, निवड केलेल्या व्यवसायानुरूप दिव्यांग व्यक्तींना व्यवसायाचे प्राथमिक शिक्षण देणे.

वाहनाची प्रादेशिक व प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ)कडून नोंदणी करणे. दिव्यांग लाभार्थ्यांचे दिव्यांग लाभार्थ्यास परवाना देण्यास नाकारल्यास त्याच्यावतीने वाहन चालविणार्‍या व सामान्य व्यक्तीला वाहन चालविण्याचा परवाना मिळवून देणे. तसेच वाहन विमा उतरविणे आदी गोष्टी या संस्थेला कराव्या लागणार आहेत.

योजनेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर प्राप्त झालेल्या विहित अर्जातून पात्र अर्जानुसार लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. ही समिती राज्यस्तरावरील आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!