Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

‘ एमएमटीसी’ एक लाख मेट्रिक टन कांदा आयात करणार

Share

नाशिक : बाजारातील आवक घटल्यामुळे राज्यातील महत्वाच्या शहरांमधील कांदा भावाने शंभरी गाठली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळात देशात १ लाख मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एमएमटीसी कंपनीला कांदा आयातीचे निर्देश दिले असून, या कांद्याचे वितरण नाफेडद्वारे करण्यात येणार आहे.

दरम्यान परतीच्या पावसामुळे कांदा खराब झाल्याने बाजारात आवक कमी झाली होती. तसेच साठवणूक केलेला कांदा देखील शिल्लक नसल्याने परिणामी कांद्याच्या दरात वाढ होऊन प्रतिकिलो १०० रुपये झाला आहे. यामुळे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने ५ सप्टेंबरला दोन हजार टन कांदा आयातीचा निर्णय घेतला होता.

आता शिल्लक राहिलेला कांदा महाग झाल्याने कर्नाटक, आंध्रप्रदेश, राजस्थान व गुजरातमधील उत्पादनावर अवलंबून असल्याने कांद्याचे घाऊक दर क्विंटलला साडेचार हजारांदरम्यान आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आयातीचा निर्णय घेतल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने दिली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!