Type to search

नाशिक

आमदार गावितांकडून नाभिक समाजबांधवांना खुर्च्यांचे वाटप

Share

लक्ष्मण सोनवणे । बेलगाव कुऱ्हे

वंचित श्रमजीवी आणि कष्टकरी असणाऱ्या नाभिक समाज बांधवांना उन्नत जीवन जगण्यासाठी खुर्ची योजना उपकारक आहे. आगामी काळात ह्या योजनेतून ग्रामीण कारागिरांना लाभ देण्यासाठी अग्रेसर राहू असे प्रतिपादन इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या आमदार निर्मला गावित यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष नयना गावित यांच्या सेस निधी अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील समाज बांधवांना आज आमदारांच्या हस्ते खुर्च्या वाटप करण्यात आल्या. यावेळी त्या बोलत होत्या. उपाध्यक्ष नयना गावित म्हणाल्या की, ग्रामीण लोकजीवनात हलाकीचे जीवन जगणारा नाभिक समाज गावाच्या विकासाला योगदान देत असतो. याही स्थितीत उमेदीने जीवन जगण्यासाठी त्यांना खुर्च्या वाटप करण्याचा निर्णय घेतला. आमदार निर्मला गावित यांच्या सूचनेनुसार ही योजना राबवल्याचे त्या शेवटी म्हणाल्या.

कार्यक्रमप्रसंगी नाशिक जिल्हा नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश सुर्यवंशी यांनी आमदार निर्मला गावित, उपाध्यक्षा नयना गावित यांचे समाजाच्या वतीने आभार मानले. याप्रसंगी योजेनचे लाभार्थी उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!