Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जंगल जगणार्‍या मनोहरने केले एव्हरेस्ट’ सर

Share

नाशिक । गोकुळ पवार
इतिहास घडवायला वय नसतं हे जगाला दाखवून देणार्‍या मनोहर हिलीमची ही गोष्ट. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरवळ या आदिवासी व छोट्याशा खेड्यात राहणार्‍या मनोहरने माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च हिमशिखर सर केले आहे.

गिर्यारोहण म्हणजे काय हे माहित नसूनही तसेच गिर्यारोहणाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या घरात मनोहरचा जन्म झाला. आई-वडील दोघेही शेती करतात. त्यामुळे एव्हरेस्ट शिखर वगैरे कधी मनोहरला ठाऊकही नव्हते. मनोहरच्या घरात एकूण अकरा माणसाचा राबता आहे. शेतीवर पोट असल्याने पिकलं तरच खायचं अन्यथा दुसर्‍याच्या शेतात जाऊन मोलमजुरी करायची.

त्र्यंबकेश्वर जवळील वाघेरा या शाळेत दहावीत असताना आदिवासी विकास विभागातर्फे मनोहरची एव्हरेस्ट शिखर मोहीम शौर्य-2 साठी निवड झाली आणि एव्हरेस्ट शिखर सर करण्याची महत्त्वाकांक्षा सत्यात उतरवण्याचे स्वप्न मनोहरने दृष्टीक्षेपात आणले. त्याने वर्धा, हैद्राबाद, दार्जिलिंग, सिक्कीम, लेह लडाख येथील खडतर प्रशिक्षणानंतर प्राथमिक माउंटेनरिंग कोर्से व ऍडव्हान्स माउंटेनरिंग कोर्से पूर्ण केले. दरम्यान या यशस्वी प्रक्रियेनंतर मनोहर 11 मार्चला शिखर मोहिमेसाठी रवाना झाला होता.

ग्रामीण भागात परिस्थिती हलाखीची असते परंतु येथील विद्यार्थी जिद्दीच्या जोरावर एव्हरेस्टही पादाक्रांत करू शकतात. याच उत्तम उदाहरण म्हणजे मनोहर हिलीम. मनोहरला सुरवातीपासूनच धावण्याची आवड होती. त्यामुळे त्याने राज्यस्तरापर्यंत मजल मारली होती. तो रोज पहाटे उठून व्यायाम व धावण्याचा सराव करीत असे. यातून पुढे एव्हरेस्ट सर करंण्यासाठी त्याला फायदा झाला.

एव्हरेस्ट सर केल्यानंतर मनोहर सांगतो कि, ‘एव्हरेस्टच्या चढताना सावधगिरी बाळगून चढाई करावी लागते, अन्यथा एखादी छोटी चूक आपल्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे आम्ही न डगमगता शिखर काबीज करत गेलो आणि आज याच धाडसामुळे माझं तसेच शाळेचे नाव एवरेस्ट शिखराच्या उंचीवर गेले आहे. एखादा यश संपादित करतांना कुटुंबाचा आधार महत्वाचा असतो आणि तो आधार माझ्या भावाने मला दिला. त्यानें मला हे स्वप्न पाहण्याची, पूर्ण करण्याची ताकद दिली. दरम्यान मोहिमेत सर्वांचीच साथ असल्याने यशस्वीरीत्या पूर्ण करता आली.

मनोहरची जिद्द , चिकाटी, मेहनत पाहून शाळेचे शिक्षक प्रा. कोरडे यांनी जबाबदारी घेत त्याची या मोहिमेसाठी निवड केली. ही निवड सार्थ ठरवत एव्हरेस्ट सरही केले. याचे सर्व श्रेय हे मनोहरला जाते. कारण मनोहरने या मिशनसाठी वेळोवेळी मेहनत घेऊन विविध चाचण्या पार पाडल्यानंतर त्याची मोहिमेसाठी निवड झाली होती. हा प्रवास मनोहरसाठी सोपा नव्हता. हा प्रवास एव्हरेस्टपुरता मर्यादित नव्हता तर आयुष्याचा रस्ता ओलांडताना पडलेलं सोनेरी स्वप्न होत… आणि ते स्वप्न एकट्या मनोहरने नाही तर त्याच्या कुटुंबानं, शाळेनंही अनुभवलंय…..

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!