Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

‘औषधनिर्माणशास्त्र’साठी नवे वेळापत्रक निश्चित

Share

नाशिक । प्रतिनिधी
सीईटी सेलने औषधनिर्माणशास्त्र, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी नवे वेळापत्रक निश्चित केले आहे. या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना 30 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. त्यानंतर 25 जून ते 1 जुलैपर्यंत अर्ज निश्चितीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

वेळापत्रकानुसार तीन फेर्‍यांत प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. महिनाभरात प्रवेशाची प्रक्रिया आटोपण्यात येणार असून ‘सेतू असिस्टेड अ‍ॅडमिशन रजिस्ट्रेशन’द्वारे (सार) प्रक्रिया ठप्प पडल्यानंतर नव्याने प्रक्रिया करण्यात येत आहे. त्यानुसार ही प्रक्रिया होणार आहे. अर्ज नोंदणी, निश्चितीची प्रक्रिया झाल्यानंतर 2 जुलै रोजी पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

दोन दिवस आक्षेप नोंदणीसाठी असतील. त्यानंतर ५ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया ३ फेर्‍यांत पूर्ण होणार असून, ६ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान या फेर्‍या पूर्ण होतील. १ ऑगस्टला शैक्षणिक वर्ष सुरू होईल. प्रवेशाची ‘कट ऑफ डेट’ १४ ऑगस्ट आहे. विद्यार्थ्यांना अधिक माहिती http://info.mhacet.org.mahacet या वेबसाइटवर मिळेल.

पैसे मिळणार परत
आता एफसी केंद्रे सुरू करण्यात आली असून त्या एफसी केंद्राची यादी वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी प्रवेश पूर्ण केले होते आणि पैसे भरले होते, त्यांच्या नावांची यादी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना दोन आठवड्यात पैसे परत केले जाणार आहेत.

अशी असेल नवी प्रवेश प्रक्रिया

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!