Type to search

अकरावी प्रवेशाच्या आठ हजार माहिती पुस्तिका प्राप्त

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

अकरावी प्रवेशाच्या आठ हजार माहिती पुस्तिका प्राप्त

Share

नाशिक । बालभारतीकडून अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिका शिक्षण उपसंचालक कार्यालयाला मिळण्यास सुरुवात झाली आहे. सुमारे 8 हजार पुस्तिका उपसंचालक कार्यालयाला प्राप्त झाल्या असून आरक्षण तक्ता तयार करण्याच्या कामातील विलंबामुळे अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेचे कामही रखडले होते.

मे महिन्याच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा प्रथम भाग भरण्यासाठी माहिती पुस्तिका उपलब्ध होऊ शकणार आहे. आरक्षण तक्ता तयार करण्यास झालेल्या विलंबामुळे लांबलेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया मे महिन्यांच्या अखेरीस सुरु होण्याची शक्यता आहे.

महापालिका परिसरात गेल्या वर्षी विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी 20 एप्रिलपासून ऑनलाइन प्रक्रियेस सुरुवात झाली होती, तर 10 मेपासून विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिकांचे वितरण सुरू झाले होते.

दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेसाठी प्रतीक्षा करावी लागली असून आता शिक्षण उपसंचालक कार्यालयास माहिती पुस्तिका प्राप्त झाल्याने विद्यार्थी व पालकांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. कार्यालयाने बालभारतीकडून सुमारे 30 हजार माहिती पुस्तिकांची मागणी केली होती. त्यापैकी आठ हजार आल्या आहेत. उर्वरीत लवकरच मिळणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!