Type to search

आता महाविद्यालयातच मिळणार उत्पन्न , नॉनक्रिमेलिअर, जात आणि अधिवास दाखला

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

आता महाविद्यालयातच मिळणार उत्पन्न , नॉनक्रिमेलिअर, जात आणि अधिवास दाखला

Share

नाशिक : नुकताच बारावीचा निकाल लागला असून पालकांची धावपळ सुरु झाली आहे. प्रवेशासाठी लागणाऱ्या शैक्षणिक कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य असते. त्यासाठी आता महाविद्यालयातच याची सोय करण्यात आली आहे.

विविध शासकीय दाखले आता महाविद्यालयातच महा-ई-सेवा केंद्रात मिळणार आहेत. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी गुरुवारी घेतलेल्या प्राचार्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

सध्या विविह परीक्षांचे निकाल लागत असून काही दिवसांत दहावीचा निकाल देखील लागणार आहे. महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी कागदपत्रे आवश्यक असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची तसेच पालकांची कागदपत्रांची पूतर्ता करतांना धावपळ होते. हि धावपळ थांबविण्यासाठी आता महाविद्यालयातच महा ई सेवा केंद्रात हे दाखले मिळणार आहेत.

बारावी निकाल लागल्यानंतर प्रवेशासाठी उत्पन्न दाखला, नॉनक्रिमेलिअर, जातीचा, अधिवास दाखला लागतो. हे सर्व दाखले आता या केंद्रात मिळणार आहेत. दाखल्यांसाठी जिल्ह्यात साडेचार महा-ई-सेवा केंद्रे असून, २३८० केंद्र नियमित सुरू आहेत.

त्याचप्रमाणे बहुतांश गावात सीएससी केंद्रही सुरू केले आहे. सेतू कार्यालयातही हे दाखले मिळतात. पण, एकाच वेळी गर्दी होत असल्यामुळे दाखल्यांचा विषय नेहमीच कळीचा होता. त्यात अनेक विद्यार्थ्यांची लुबाडणूक होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय हा विद्यार्थ्यांना दिलासा देणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!