Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

उद्योगाची चाके आज पासून धडाडणार; उद्योगात आग व चोर्‍यांचा आकडा निरंक; उद्योजक समाधानी

Share

सातपूर । प्रतिनिधी

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेल्या उद्योगक्षेत्राची चाके आजपासून पुन्हा धडाडणार आहेत. गेले पाच दिवस उद्योगक्षेत्रात चोख पोलिस बंदोबस्त कोणतीही चोरीची दुर्घटना घडलेली नसल्याबद्दल उद्योजकांसह पोलिसांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे.

दिवाळी निमित्त सलग पाच दिवस उद्योग क्षेत्राला सुट्टी असल्याने कारखान्यातील मौल्यवान वस्तूंची चोरी होणे हे नित्याचे झाले होते. मागील तीन ते चार वर्षांपासून उद्योजक व पोलीस यांच्यात समन्वयातून बंदोबस्त लावला जात असल्याने चोरीचे अथवा दुर्घटनेचे प्रमाण शून्यावर आले आहे. उद्योजक संघटनांनी याबद्दल पोलीस प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून दरवर्षी दिवाळीपूर्वी पोलीस व उद्योजकांची संयुक्त बैठक होत असते या बैठकीत बंदोबस्त बाबत नियोजन केले जाते. पोलिसांच्या दृष्टीने अडचणीच्या बाबी उद्योजकांसमोर मांडले जातात त्यावर योग्य उपाययोजना करून सुरक्षा यंत्रणा निर्दोष करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असल्याने यावर्षीही एकही चोरी न झाल्याची नोंद असल्याने उद्योजकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

आगीचे प्रमाणही निरंक

सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये पूर्वी दिवाळीच्या काळात विद्युत पुरवठा सुरू राहण्यामुळे अथवा शॉर्ट सर्किट मुळे आग लागण्याचे प्रमाण नित्याचे झाले होते. यावर्षी मात्र उद्योजकांनी जागरुकता पाळल्याने उद्योग क्षेत्र परिसरात आगीचा आकडाही निरंंक राहिल्याचे चित्र आहे. मागील वर्षी सातपूर येथील अग्निशमन केंद्राकडे दिवाळीच्या दिवसांमध्ये ठिकाणी लग्नाच्या 35 घटकांची नोंद होती. मात्र जनसामान्यांमध्ये आलेली जागरूकता लक्षात घेता यंदा मात्र एकही घटना न घडल्याने अग्निशमन कर्मचार्‍यांनीही समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!