Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मुनिश्रींना निमंत्रणासाठी 108 फुटी पत्र सादर

Share

नाशिक । प्रतिनिधी
शहरातील श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र म्हसरुळ येथे चातुर्मासासाठी अहिंसा तीर्थ प्रणेता, युवा मुनिश्री प्रमुखसागरजी महाराज यांना निमंत्रित करण्यासाठी शहरातील गजपंथ तीर्थक्षेत्र ट्रस्ट मंडळातर्फे जगातील सर्वात लांब सुमारे 108 फूट लांबीचे विनंती पत्र तयार करण्यात आले असून ते आज महाराजांना सादर करण्यात आले.

22 जुलैपासून जैन धर्मीयांचे चातुर्मास सुरु होतात. या काळात सर्व जैन साधू एकाच ठिकाणी राहतात. कारण या काळात जीव उत्पत्ती जास्त होत असल्याने चालतांना, फिरतांना अनेक जिवांची हत्या होते. ती हिंसा न होण्यासाठी ते या 4 महिन्यांच्या काळात एकाच गावात राहतात. एका गावाहून दुसर्‍या गावात प्रवास करीत नाही.

श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र म्हसरुळ येथे दरवर्षी प्रसिद्ध संत चातुर्मासासाठी येत असतात. दरवर्षीप्रमाणे या वर्षींही संस्थेतर्फे चातुर्मासाची तयारी सुरु झाली आहे. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी असणार्‍या साधूंना तेथे जाऊन निमंत्रण द्यावे लागते. त्यांना विनंती करावी लागते.

त्यानुसार अगोदर अनेक गुरू महाराजांना निमंत्रण देण्यात आले होते, परंतु त्यापैकी कोणीही येऊ शकत नाही. त्यातच मुंबई येथे नुकतेच आचार्य पुष्पदंतसागरजी महाराजांचे शिष्य व क्रांतिकारी राष्ट्रसंत मुनिश्री तरुणसागरजी महाराजांचे गुरुबंधू अहिंसा तीर्थ प्रणेता, युवा मुनिश्री प्रमुखसागरजी यांचे आगमन झालेले आहे. त्यांची माहिती मिळताच गजपंथ तीर्थक्षेत्र ट्रस्ट मंडळातर्फे त्यांना बोलावण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

त्याअंतर्गत त्यांना विनंती करण्यासाठी 108 फूट लांब, 2 फूट रुंद महाभव्य विनंती पत्र संस्थेतर्फे तयार करण्यात आले आहे. यामध्ये गुरू महाराजांनी गजपंथ येथे का यावे, त्यांच्या येण्याने या क्षेत्राचा काय फायदा होणार आहे, समाजाला काय फायदा होईल, त्यांना काय फायदा होईल आदी गोष्टींची माहिती लिहिली गेली आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील विविध जैन धार्मिक क्षेत्रांचे अध्यक्ष, समाजाचे अध्यक्ष यांचे पत्रही यामध्ये समाविष्ट केले गेले आहे.

असे तयार झाले पत्र
संपूर्ण जगात पहिल्यांदाच एवढे मोठे पत्र तयार करण्यात आले आहे. पत्र तयार करण्यासाठी 8 दिवसांचा कालावधी लागला आहे. सतत 8 दिवस बसून यामध्ये लिहिण्यासाठी मजकूर तयार करण्यात आला आहे. याची लांबी-108 फूट लांब, 2 फूट रुंदी आहे. संपूर्ण पत्र सलग कागदावर तयार करण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!