Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : आदिवासी मुलांच्या म्युझिकल स्कूलसाठी ‘तो’ करतोय ५० तास बँड वादन

Share

नाशिक : आदिवासी मुलांसाठी म्युझिकल स्कुल सुरू करण्यासाठी नाशिकच्या विनेश नायर हा कलाकार सलग ५० तास बँडवादन करत आहे. त्याच्या उपक्रमात एमएच १५ बँड ग्रुपच्या सदस्यांची मदत होत आहे. विनेशच्या आर्थिक मदतीसाठी हा संघ पुढे येत आहे.

आदिवासी मुलांनी शालेय शिक्षणासोबतच संगीत क्षेत्रात ही पुढे जावे, यासाठी म्युझिकल स्कूल स्थापन करण्यात येणार, यासाठी नाशिककरांनी देखील मदत करावी, यासाठी विनेश नायर या कलाकाराने नाशिकच्या सिटी सेंटर मॉलमध्ये सलग ५० तास बँडवादन सुरू केले आहे. आदिवासी मुलांसाठी विनेशने घेतलेल्या पुढाकाराला नाशिककर देखील मोठा प्रतिसाद देत आर्थिक मदतीसाठी पुढे येत आहेत. २४ एप्रिल सायंकाळी 5 वाजेपासून विनेशने बँड वादनास सुरुवात केली आहे. २५ एप्रिल सायंकाळी ७ वाजेपर्यंत तो सलग ५० तास बँड वादन करणार आहे.

या उपक्रमात विनेशला प्रोत्साहन देण्यासाठी एमएच १५ बँड ग्रुपकडून बिट थेरिपी, ओपन माईक, गरभा नाईट कार्यक्रम तसेच शहरातील २०० ड्रमर्स विनेशला वेळी-वेळी साथ देत आहेत.
यावेळी विविध सामाजिक संघटनादेखील विनेशच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. नाशिकमध्ये महिलांसाठी काम करणाऱ्या डब्लूओडब्लू ग्रुपने आदिवासी मुलांसाठी म्युझिकल स्कूल सुरू करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले असल्याचे डब्लूओडब्लू ग्रुपच्या संस्थापिका अश्विनी न्याहाराकर यांनी सांगितले.
याआधी विनेश नायर याने आदिवासी मुलांच्या शैक्षणिक मदतीसाठी २०१४ मध्ये १६ तास तर २०१८ मध्ये तब्बल ३० तास सलग बँडवादन केले आहे. त्याच्या या सामाजिक उपक्रमात कलाकार राहुल अंबेकर, गणेश जाधव, नयन देवरे, सनी बाग, गौरव गौरी, यश कदम आदींचे सहकार्य मिळत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!