Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जिल्ह्यातील पारा घसरला; तापमान 16 अंशावर; मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसांची शक्यता

Share

नाशिक । प्रतिनिधी

उत्तर भारतात काही राज्यात होत असलेला बर्फवृष्टी आणि अलिकडच्या काळात बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात येऊन गेलेल्या चक्रीवादळांंमुळे झालेल्या अतिवृष्टीच्या परिणाम पुर्व व पश्चिम पट्ट्यात उमटू लागली आहे. राज्यात कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तापमानात बदल होत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठावाडा भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. आज उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वात कमी १३.६ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात पारा १६.४ अंशावर आल्याने अनेक भागात रात्री व पहाटेची थंडी जाणवू लागली आहे.

गेल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रातील पारा तीन अंशाने खाली घसरला होता. तसेच विदर्भ व मराठवाड्यात देखील किमान तापमानात लक्षणीय घट झाली होती. आज देखील राज्यात विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. यामुळे या भागात आता थंडी जाणू लागली आहे. उद्या मध्य महाराष्ट्रात काही भागात तुरळक पावसांची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे

काल  महाबळेश्वर येथे किमान तापमान १४.९ अंश नोंदविले गेले. नाशिक व अहमदनगर हे थंडीचे केंद्र बनल्याचे गेल्या तीन चार वर्षात समोर आले आहे. राज्यात थंडीला प्रारंभ झाल्यानंतर मागील आठवड्यात राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद अहमदनगर जिल्ह्यात झाली आहे. तीन दिवसांपूर्वी पारा तीन अंशाने खाली आला होता.

नंतर पारा पुन्हा १७ अंशावर गेला आहे. जळगाव १६.२, मालेगांव १७, महाबळेश्वर १४.९, औरंगाबाद १४.७, सातारा १७, पुणे १५.३ किमान तापमानाची नोंद झाली आहे. नाशिक जिल्ह्यात पारा येणार्‍या आठवड्यात १४ अंशापर्यत खाली येणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!