Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकमध्ये हुडहुडी वाढणार; तापमान तीन अंशांनी घसरले

Share

नाशिक | प्रतिनिधी 

यंदा राज्यात विक्रमी पाऊस झाल्याने पुढच्या तीन महिन्यांत थंडीची विक्रमी नोंद होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज अचानक तापमान तीन अंशांनी घटल्यामुळे नाशिककरांनी गुलाबी थंडीचा आनंद घेतला.

राज्यात यंदा जूनऐवजी खर्‍या अर्थाने पाऊस जुलै महिन्यात सुरू झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात विक्रमी पाऊस झाला. तसेच परतीच्या पाऊस दिवाळीपर्यंत राहिल्यामुळे थंडीचा महिना उशिराने सुरु झाला आहे.

ऑक्टोबर हिटमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे गुलाबी थंडीची चाहूल एक महिना उशिराने लागायला सुरुवात झाली आहे. आज अचानक तीन अंशांनी घटल्याने अचानक सकाळच्या सुमारास गारठा वाढलेला दिसून येत आहे.

थंडीचा जोर, मुक्काम वाढणार

गतवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात नाशिकचे किमान तापमान 14 अंशावरून 11 अंशावर गेले होते. यावर्षी मात्र,  १८ नोव्हेंबर रोजी राज्यात नाशिक जिल्ह्यात सर्वात कमी अशी १४.७ अंश किमान तापमानाची नोंद झाली.

तर गेल्या वर्षी 17 डिसेंबरला नाशिकचा पारा 8.5 अंशावर आणि 19 डिसेंबरला तो 7.9 अंशावर गेला होता. त्यानंतर 27 डिसेंबर रोजी पारा 5.7 अंशावर खाली आला होता.

अशाप्रकारे गत वर्षात 27 डिसेंबर 2018 रोजी जिल्ह्यात हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती. यंदा जिल्ह्यात पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला असल्याने यानुसार यंदा थंडीच्या विक्रमाबरोबरच थंडीचा मुक्कामदेखील वाढण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!