Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी तर मालेगाव बीसीसी महिलेसाठी राखीव; आरक्षण सोडत जाहीर

Share
करोनासंदर्भात प्रशासनाकडून पूर्वतयारीवर भर : राधाकृष्ण गमे; Preparation by the administration regarding the corona: Radhakrishna Game

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज पार पडला. यंदाचे महापौर आरक्षण सर्वसाधारण उमेदवारासाठी खुले राहणार आहे. तर मालेगाव महापालिकेचे महापौरपद बीसीसी महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

नाशिकसह राज्यातील 27 महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज दुपारी तीन वाजता पार पडली.  महापौर पदाच्या आरक्षण सोडतीस महापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते व विरोधी पक्षनेते यांनी उपस्थित होते.

नाशिक महापालिका महापौरांची मुदत येत्या 15 डिसेंबर 2019 रोजी संपत आहे. महापौर रंजना भानसी यांची मुदत गेल्या 15 सप्टेंबर 2019 रोजी संपणार होती, मात्र विधानसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागु झाल्याने शासनाने राज्यातील मुदत संपणार्‍या महापौरांना तीन महिन्याची मुदत वाढवून देण्यात आली होती. आता पुढील महिन्यात ही मुदत संपणार असल्याने शासनाने महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर केली आहे.

नाशिक महापालिकेत गेल्या पंचवार्षिक काळात महापौर पदाचे सर्वसाधारण गटासाठी असे आरक्षण जाहीर झाले होते. त्यावेळी मनसेनेकडुन अ‍ॅड. यतिन वाघ यांना महापौर करण्यात आले होते.

त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात इतर मागास वर्ग गटाच्या आरक्षणातून अशोक मुतर्डक हे महापौर झाले होते. आता अनुसुचित जमाती गटाच्या आरक्षणातून विद्यमान महापौर रंजना भानसी कार्यरत होत्या. पुन्हा एकदा महापालिकेची आरक्षण सोडत खुल्या सर्वसाधारण गटासाठी निघाली असल्यामुळे महापौर कोण होणार याकडे नाशिकमधील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

२७ महापालिकेतील आरक्षण सोडत जाहीर

 •  मुंबई- ओपन
 •  पुणे – ओपन
 •  नागपूर – ओपन
 •  ठाणे- ओपन
 •  नाशिक – ओपन
 •  नवी मुंबई – ओपन महिला
 •  पिंपरी चिंचवड – ओपन महिला
 •  औरंगाबाद- ओपन महिला
 •  कल्याण डोंबिवली – ओपन
 •  वसई विरार- अनुसूचित जमाती
 •  मिरा भाईंदर-अनुसुचित जाती
 •  चंद्रपूर – ओपन महिला
 •  अमरावती- बीसीसी
 •  पनवेल- ओपन महिला
 •  नांदेड-बीसीसी महिला
 •  अकोला – ओपन महिला
 •  भिवंडी- खुला महिला
 •  उल्हासनगर- ओपन
 •  अहमदनगर- अनुसूचित जाती (महिला)
 •  परभणी- अनुसूचित जाती (महिला)
 •  लातूर – बीसीसी सर्वसाधारण
 •  सांगली- ओपन
 •  सोलापूर-बीसीसी महिला
 •  कोल्हापूर-बीसीसी महिला
 •  धुळे – बीसीसी सर्वसाधारण
 •  मालेगाव – बीसीसी महिला
 •  जळगाव खुला महिला
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!